-
बॉलिवूडमधील अतिशय सुंदर अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय बच्चन ओळखली जाते. पण लग्नानंतर ऐश्वर्याच्या चित्रपटांनी फारशी कमाई केली नसल्याचे म्हटले जाते. पण ऐश्वर्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. तिने त्या नाकारल्या असल्याचे म्हटले जाते. चला जाणून घेऊया त्या चित्रपटांविषयी..
-
राजा हिंदूस्तानी चित्रपटासाठी सुरुवातीला ऐश्वर्याला विचारले असल्याचे म्हटले जाते. पण त्यावेळी ऐश्वर्या शिक्षण घेत असल्यामुळे तिने चित्रपट नाकारला असल्याचे म्हटले जाते.
-
करण जोहरच्या कभी खुशी कभी गम चित्रपटासाठी ऐश्वर्याला विचारण्यात आले असल्याचे म्हटले जाते. चित्रपटातील काजोलच्या भूमिकेसाठी तिची निवड करण्यात आली असल्याचे म्हटले जाते.
-
चलते चलते चित्रपटासाठी देखील ऐश्वर्याला विचारण्यात आल्याच्या त्यावेळी चर्चा रंगल्या होत्या.
-
मुन्नाभाई एमबीबीएस हा सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटासाठी देखील ऐश्वर्याची निवड करण्यात आल्याचे म्हटले जात होते. (Photo Credit : Youtube)
-
विर झारा चित्रपटासाठी यश चोप्रा यांची पहिली पसंती ऐश्वर्याला होती. पण इतर चित्रपटांमध्ये व्यग्र असल्यामुळे तिने नकार दिला असल्याच्या चर्चा होत्या.(Photo Credit : Youtube)
-
२००७मध्ये प्रदर्शित झालेला भुलभुलैय्या चित्रपट हिट झाला होता. या चित्रपटासाटी ऐश्वर्याला विचारण्यात आल्याचे म्हटले जाते.
-
करण जोहरच्या दोस्ताना या चित्रपटासाठी ऐश्वर्याला विचारण्यात आले होते. तिला चित्रपटाची कथा देखील आवडली होती. पण चित्रपटात तिचा पती अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत असल्यामुळे तिने नकार दिला असल्याचे म्हटले जाते.
-
करण जोहरने कुछ कुछ होता है चित्रपटासाठी रविना टंडन, ट्विंकल खन्ना, ऐश्वर्या राय या अभिनेत्रींना विचारले असल्याचे म्हटले जाते
-
हिरोईन या चित्रपटासाठी करीना कपूर आधी ऐश्वर्याला ऑफर देण्यात आल्याचे म्हटले जाते. पण त्यावेळी ऐश्वर्या प्रेग्नंट असल्यामुळे तिने चित्रपटाला नकार दिल्याच्या चर्चा सुरु होत्या.
-
क्रिश चित्रपटासाठी देखील ऐश्वर्याची निवड करण्यात आली होती. पण ऐश्वर्याने नकार दिल्याचे म्हटले जाते. (Photo Credit : Youtube)
ऐश्वर्या रायने नाकारली होती ‘या’ चित्रपटांची ऑफर?
जाणून घ्या त्या चित्रपटांविषयी..
Web Title: Hit movie offers declined by aishwarya rai avb