-
सोनी टीव्हीवर प्रसारित होणारी क्राईम पेट्रोल ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनोरंजनाचं आणि प्रबोधनाचं काम करत आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
-
सत्य घटनांवर आधारित या मालिकेमध्ये काम करणारे कलाकारही आता सर्वांच्या परिचयाचे झाले आहेत.
-
या मालिकेत पोलिसाची भूमिका साकारणाऱ्या निसार अली हे या मालिकेमुळे प्रकाशझोतात आले. त्यांना अभिनय क्षेत्रात क्राईम पेट्रोलमुळेच ओळख मिळाली.
-
निसार अली यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून (एनएसडी) शिक्षण घेतलं आहे. ९० च्या दशकापासूनच ते अभिनयाच्या क्षेत्रात आहेत.
-
सर्वप्रथम १९९५ मध्ये त्यांनी आहट या मालिकेत भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या.
-
स्टार प्लसवर येणाऱ्या महाभारत या मालिकेतही त्यांनी भूमिका साकारली होती. परंतु त्यांना खरी ओळख ही क्राईम पेट्रोल याच मालिकेतून मिळाली.
-
२०११ पासून नासिर खान हे क्राईम पेट्रोल या मालिकेचा भाग बनले. तेव्हापासून आतापर्यंत ते या मालिकेशी जोडले गेलेले आहेत.
-
त्यांनी लक्ष्य, डी डे अशा काही चित्रपटांमध्ये भूमिकाही साकारल्या होत्या. त्यांच्या भूमिका प्रेक्षांच्या पसंतीस उतरल्या होत्या.
-
निसार अली यांनी एअरलिफ्ट या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. याव्यतिरिक्त त्यांनी तानाजी या चित्रपटातही भूमिका साकारली होती.
-
निसार अली यांचं लग्न झालं असून त्यांच्या पत्नीचं नाव तबस्सूम अहमद असं आहे.
‘एनएसडी’ ग्रॅज्युएट आहेत Crime Patrol फेम निसार अली; अक्षय, इरफानसोबतही केलंय काम
Web Title: Crime patrol sony starcast nisar khan know bout akshay kumar costar lifestyle networth income biography and personal life jud