• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. legendary singer sp balasubramanyam passes away at 74 know interesting facts about his life jud

एस.पी.बालसुब्रमण्यम : १२ तासांत रेकॉर्ड केलेली २१ गाणी; ४० हजार गाण्यांना आवाज देणारा गायक हरपला

गिनिज बुकमध्येही आहे त्यांच्या नावाची नोंद

September 25, 2020 14:26 IST
Follow Us
  • प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७४ वर्षीय त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन आठवड्यांपूर्वी बालसुब्रमण्यम यांनी करोनावर मात केली होती. (सर्व फोटो - इंडियन एक्स्प्रेस, एस.पी.बालसुब्रमण्यम, इन्स्टाग्राम)
    1/

    प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७४ वर्षीय त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन आठवड्यांपूर्वी बालसुब्रमण्यम यांनी करोनावर मात केली होती. (सर्व फोटो – इंडियन एक्स्प्रेस, एस.पी.बालसुब्रमण्यम, इन्स्टाग्राम)

  • 2/

    मात्र त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

  • 3/

    एसपी बालसुब्रमण्यम हे ९० च्या दशकातील सलमान खानचा आवाज म्हणून ओळखले जायचे. जवळपास एका दशकाहून अधिक काळ त्यांनी सलमानसाठी गाणी गायली.

  • 4/

    मैने प्यार किया या चित्रपटातील दिल दिवाना या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअरचा उत्कृष्ट गायकाचा पुरस्कारही मिळाला.

  • 5/

    एस.पी.बालसुब्रमण्यम यांचा जन्म ४ जून १९४६ रोजी आंध्र प्रदेशातील नेल्लूर येथे झाला. १५ डिसेंबर १९६६ रोजी त्यांनी श्री श्री श्री मर्यादा रामण्णा या तेलगू चित्रपटाद्वारे पार्श्वगायक म्हणून पदार्पण केलं.

  • 6/

    १९६९ मध्ये त्यांना आपलं पहिलं तामिळ गाणं रकॉर्ड करण्याची संधी मिळाली. एयर्कई एन्नुम इलाया कन्नी असं ते गाणं असून यात तामिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार जैमिन गणेशनदेखील होते.

  • 7/

    १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या संकराभारनाम या चित्रपटातून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. या चित्रपटातील गाण्यासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

  • 8/

    यानंतर बालसुब्रमण्यम यांना दक्षिणेकडील स्टार एमजीआरच्या इरम निलावे वा या चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. या चित्रपटात जयललितादेखील मुख्य भूमिकेत होत्या.

  • 9/

    पण दुर्दैवाने रेकॉर्डिंगपूर्वी बालसुब्रमण्यम यांना टायफॉईड झाला. यामुळे ते निराश झाले. परंतु एमजीआर मागे हटले नाहीत.

  • 10/

    टायफॉयडमधून बरे होऊन ते परत येईपर्यंत एमजीआर यांनी चित्रीकरण पुढे ढकलण्याचा आणि त्यांनाच गाण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला.

  • 11/

    ते यातून बरे झाल्यानंतर जयपूरमध्ये चित्रीकरण झालेलं हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं.

  • 12/

    त्यांनी आपल्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत तेलुगु, तामिळ, कन्नड, हिंदी आणि मल्याळम अशा चित्रपपटांमध्ये ४० हजार गाणी गायली.

  • 13/

    कन्नड संगीतकार उपेंद्र कुमार यांच्यासाठी त्यांनी १२ तासांमध्ये २१ गाणी स्वरबद्ध केली. यासाठी त्यांचं नाव गिनिज बुक ऑफ वर्ल़्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आलं.

  • 14/

    अनेकदा बालसुब्रमण्यम यांनी एकावेळी अनेक भाषांमध्ये १६-१७ गाणीही स्वरबद्ध केली आहेत. अनेकदा त्यांनी १७ तास सलगही गाणी गायली आहेत.

  • 15/

    १९९२ मध्ये बालसुब्रमण्यम यांनी ए.आर.रेहमान यांच्यासोबत रोजा या चित्रपटात पहिल्यांदा काम केलं.

  • 16/

    १९९२ मध्ये बालसुब्रमण्यम यांनी ए.आर.रेहमान यांच्यासोबत रोजा या चित्रपटात पहिल्यांदा काम केलं.

  • 17/

    रोजा हा चित्रपट तिनही भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. त्या सर्वांसाठी त्यांनी गाणी गायली होती. तसंच यानंतर दोघांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं.

  • 18/

    बालसुब्रमण्यम हे उत्कृष्ट गायक तर होतेच. परंतु याव्यतिरिक्त त्यांनी तामिळ, तेलुगु, कन्नड आणि हिंदी भाषेतील ४० पेक्षा अधिक चित्रपटांना संगीतही दिलं होतं.

  • 19/

    ९० च्या दशकात जेव्हा ते सलमान खानचा आवाज म्हणून ओळखले जायचे तेव्हा त्यांनी यातून ब्रेक घेतसा. त्यांना पूर्णवेळ अभिनेता होण्याचीही इच्छा होती. त्यानंतर त्यांनी ७२ चित्रपटांमध्ये अभिनयही साकारला होता.

  • 20/

    १५ वर्षांच्या ब्रेकनंतर त्यांनी २०१३ मध्ये गायक म्हणू चेन्नई एक्स्प्रेस या चित्रपटातीस गाणं स्वरबद्ध केलं. २०११ मध्ये त्यांना पद्भभूषण पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं.

Web Title: Legendary singer sp balasubramanyam passes away at 74 know interesting facts about his life jud

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.