• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. happy birthday ranbir kapoor affairs girlfriends break ups ssj

बॉलिवूडचा ‘कॅसिनोव्हा’ रणबीरने आलियापूर्वी केलंय ‘या’ अभिनेत्रींना डेट

September 28, 2020 08:43 IST
Follow Us
    • बॉलिवूडचा 'रॉकस्टार' म्हणजेच अभिनेता रणबीर कपूरचा आज वाढदिवस. रणबीर बऱ्याच वेळा त्याच्या चित्रपटांपेक्षा पर्सनल लाइफ आणि रिलेशनशीपमुळे चर्चेत असतो. त्यामुळेच आज त्याच्या रिलेशनशीपविषयी काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
    • रणबीर कायम त्याच्या चित्रपट आणि रिलेशनशिपमुळे चर्चेत राहिला आहे. त्यामुळेच त्याला बऱ्याचदा बॉलिवूडचा ‘कॅसिनोव्हा’ असेही म्हटले जाते. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडले गेले आहे. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्याने काही अभिनेत्रींना डेट केल्याचं म्हटलं जातं.
    • कॉलेजच्या दिवसांमध्ये रणबीर अवंतिकाला डेट करत होता असं म्हटलं जातं. त्यावेळी अवंतिकाचं लग्न झालं नव्हतं. त्यामुळे ते एकमेकांना डेट करत होते. त्यांचे हे नाते तब्बल ५ वर्षे टिकले. पण त्यानंतर काही कारणांमुळे दोघांमध्ये दुरावा आला आणि ते वेगळे झाले. त्यानंतर अवंतिकाने अभिनेता इम्रान खानसोबत लग्न केले.
    • ‘साँवरिया’ या सिनेमातून पदार्पण करणाऱ्या रणबीरचे नाव याच सिनेमातील अभिनेत्री सोनम कपूरसोबतही जोडले गेले होते. पण सोनमने एका कार्यक्रमात स्पष्ट केले की, रणबीर हा ‘बॉयफ्रेण्ड मटेरियल’ नाही. त्याच्यासोबत नात्यात राहणं तिच्यासाठी फार कठीण आहे.
    • यानंतर प्रसिद्ध फॅशन डिझायनर नंदिता महतानी ही रणबीरची लहानपणापासूनची क्रश होती. दोघंही बरीच वर्षे एकमेकांना डेट करत होते. पण दोघांमध्ये १० वर्षांचे अंतर असल्यामुळे दोघांचे नाते फार पुढे जाऊ शकले नाही.
    • अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांचं रिलेशन त्यावेळी प्रचंड गाजलं होतं. विशेष म्हणजे दीपिकाने रणबीरच्या नावाचा टॅटूही मानेवर गोंदवून घेतला होता. पण त्याच्या इतर नात्यांप्रमाणे हे नातेही फार काळ टिकले नाही. काही कारणास्तव या दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि ते विभक्त झाले.
    • एका दुसऱ्या मुलीमुळे रणबीर आणि तिच्या नात्यात दुरावा आला असं दीपिकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. तर दुसरीकडे मात्र,नीतू कपूर यांना दीपिका आणि रणबीरचे नाते फारसे पटत नव्हते आणि रणबीर आपल्या आईची कोणतीच गोष्ट नाकारत नसल्यामुळे हे नाते संपुष्टात आले, असं म्हटलं जातं.
    • या सगळ्या मुलींमध्ये रणबीरच्या हृदयावर खऱ्या अर्थाने कोणी राज्य केले असेल तर ती कतरिना कैफ. या दोघांच्या प्रेमाची सुरूवात ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या सिनेमाच्या सेटवरुन झाली. दोघे अनेक वर्षे लिव्ह- इनमध्येही राहत होते. पण अखेर त्याच्या इतर नात्यांप्रमाणेच या नात्यातही दुरावा आला आणि ‘जग्गा जासूस’ सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी दोघांचे ब्रेकअप झाले.
    • कतरिनानंतर रणबीरचे नाव पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानसोबत जोडले गेले. दुबईतील एका कार्यक्रमात दोघांना एकत्र पाहण्यात आले होते. पण तेव्हा त्या दोघांनीही सांगितले होते की, ते दोघे सिंगल असून आनंदी आहेत. या अभिनेत्रींव्यतिरिक्त रणबीरचे नाव नर्गिस फाकरी, श्रुती हसन यांच्यासोबतही जोडले गेले. पण कालांतराने या फक्त अफवाच होत्या हे सिद्ध झाले.
    • सध्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. दोघंही आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या चर्चांनीही जोर धरला आहे.

Web Title: Happy birthday ranbir kapoor affairs girlfriends break ups ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.