-
मराठी बिग बॉसमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सईचा आज साखरपुडा पार पडला, या छोटेखानी सोहळ्याचे फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट केले आहेत. (फोटो सौजन्य – सई लोकूर इन्स्टाग्राम)
-
काही दिवसांपूर्वीच सईने ही गोड बातमी आपल्या सर्व चाहत्यांना दिली होती, परंतू त्यावेळी सईने आपल्या जोडीदाराचं नाव गुलदस्त्यात ठेवलं होतं.
-
त्यामुळे चाहत्यांनाही सईचा साथीदार नेमका आहे तरी कोण अशी उत्सुकता लागली होती. अखेरीस या रहस्यावरचा पडदा उठला असून सईच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव तीर्थदीप रॉय असं आहे.
-
सईने आधीच्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे तिच्या होणा-या नव-याला सुंदर खळी आहे. म्हणूनच तिने #mydimpledguy असा हॅशटॅग वापरला होता.
-
तीर्थदीप हा नेमकं करतो काय?? तो देखील फिल्म इंडस्ट्रीशीच निगडीत आहे का हे अद्याप समजू शकलेलं नाही तरीही दोघांनी फिल्मी स्टाईलने फोटोशूट केलं आहे.
-
सई लोकूर बिग बॉस आधी 2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करु’ या हिंदी चित्रपटात देखील झळकली होती. यात सईने कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
सई लोकूरचा साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे तिचा जोडीदार??
सोशल मीडियावर शेअर केले फोटो
Web Title: Marathi actress sai lokur share her engagement pictures on instagram psd