'बिग बॉस' हा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून ओळखला जातो. 'बिग बॉस'चा १४ वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉस १४ मधील कंटेस्टेंट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. १० प्रतिस्पर्ध्यामध्ये निक्की तांबोळी हिची सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चा सुरु आहे. या सीजनमधील प्रतिस्पर्धी असणारी अभिनेत्री निक्की तंबोळी हिने सलमान खानचं मन जिंकलं आहे. सलमान खान आणि निक्की यांच्यातील मजेदार संभाषणाने सर्वांची मनं जिंकली आहे. बबली स्वभावाची निक्की तांबोळी शहनाज गिल सारखी दिसतेय. सर्वांचं मनं जिंकणारी ही निक्की तांबोळी नेमकी आहे कोण? जाणून घेऊयात तिच्याबद्दल… दाक्षिणात्य अभिनेत्री निक्की तंबोलीनेही बिग बॉसच्या घरात धमाकेदार एण्ट्री घेतली. निक्कीचा जन्म औरंगाबादमध्ये झाला असून ती महाराष्ट्रीयन आहे. सध्या निक्की दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करते. तिचा कांचना ३ हा सिनेमा विशेष गाजला. २४ वर्षीय निक्की तांबोळीचा जन्म २१ ऑगस्ट १९९६ रोजी झाला आहे. मुळची औरंगाबादची असणारी निक्की सध्या मुंबईत राहते. लहानपणापासून निक्की तांबोळीला ग्लॅमर विश्वाकडे कल होता. तिने औरंगाबादमध्येच पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. मॉडेल म्हणून निक्कीने करिअरची सुरुवात केली आणि नंतर टीव्ही जाहिरातींमध्ये काम केले. निक्की तांबोळीचे वडील दिगंबर तांबोळी एक व्यावसायीक आहेत. Kanchana 3, Thippara Meesam 2019 आणि Chikati Gadilo Chitha Kotudu या चित्रपटात निक्कीने काम केलं आहे. निक्की तांबोळी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे ग्लॅमरस फोटोंमुळे निक्की सतत चर्चेत असते. -
सर्व फोटो @nikki_tamboli येथून घेतले आहेत.
सलमानचं मन जिंकणारी मराठमोळी निक्की तांबोळी आहे तरी कोण?
जाणून घ्या औरंगाबादच्या निक्की तांबोळीबद्दल…
Web Title: Who is nikki tamboli bigg boss 14 nck