-
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही छोटया पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत सर्वच कलाकार लोकप्रिय आहेत. या मालिकेतील व्यक्तीरेखेच्या नावावरुनच या कलाकारांना बाहेर लोक ओळखतात. त्यावरुन या मालिकेची लोकप्रियता लक्षात येते. अशाच पात्रांपैकी एक आहेत, माधवी भाभी. त्यांचे मूळ नाव आहे सोनालिका जोशी. (सर्व फोटो सौजन्य – सोनालिका जोशी इन्स्टाग्राम)
-
या मालिकेत सोनालिका जोशीने गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडे गुरुजींच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.
-
पहिल्या भागापासून सोनालिका जोशी या मालिकेत माधवी भाभीचे पात्र साकारत आहेत. मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्याबरोबर त्यांचं चांगलं मैत्रीचं नातं आहे. जनसत्ताने हे वृत्त दिलं आहे.
-
सोनालिक जोशीसोबत काम करणाऱ्या काही कलाकारांनी ही मालिका सोडली आहे. सोनालिका यांची व्यक्तीरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडते.
-
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत हसरी-खेळकर काळजी करणारी, माधवी भाभी त्यांनी रंगवली आहे. पण खऱ्या आयुष्यात मात्र त्या बिनधास्त स्वभावाच्या आहेत.
-
सोनालिका जोशीचा जन्म पाच जून १९७६ रोजी एका मराठी कुटुंबात झाला. सोनालिकाने इतिहास हा विषय घेऊन बीएमध्ये पदवी मिळवली आहे.
-
सोनालिकाने फॅशन डिझायनिंग आणि थिएटरचेही शिक्षण घेतले आहे. सोनालिका यांचा समीर देशमुख यांच्याबरोबर विवाह झाला आहे.
-
सोनालिका आणि समीर या जोडप्याला आर्या नावाची एक मुलगी आहे. सोनालिका सध्या मुंबईत आपल्या कुटुंबासोबत राहतात.
-
करीयरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये सोनालिका जोशी यांनी नाटकांमध्ये अभिनय केला आहे. सोनालिकाने काही मराठी मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे.
-
२००८ साली सोनालिका जोशी यांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत माधवी भिडे ही भूमिका मिळाली. सोनालिका जोशी यांच्याशिवाय माधवी भिडेच्या भूमिकेत प्रेक्षक दुसऱ्या कोणाचा विचारच करु शकत नाहीत. ही त्यांच्या अभिनयाची ताकद आहे.
‘माधवी भाभी’ची तारक मेहता मालिकेच्या निर्मात्याबरोबर आहे खास मैत्री
Web Title: Taarak mehta ka oolta chashma fame sonalika joshi aka madhvi bhabhi know all about her dmp