Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. akshay kumar to ashutosh rana bollywood actors who played transgender in films dcp 98 ssj

चौकटीला छेद! ‘या’ अभिनेत्यांनी दिला तृतीयपंथीयांच्या भूमिकेला न्याय

October 20, 2020 13:11 IST
Follow Us
    • बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांच्याच ठरलेल्या पठडीतील भूमिकांना छेद देऊन नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करत असतात. आजवर अनेक कलाकारांना आपण नायक, खलनायक अशा भूमिका साकारताना पाहिलं आहे. मात्र, असे काही कलाकार आहेत ज्यांनी स्त्री वेशातील किंवा तृतीयपंथी व्यक्तीची भूमिकादेखील साकारली आहे. त्यामुळे हे कलाकार कोण ते जाणून घेऊयात.( सौजन्य : )
    • खासकरुन खलनायकी भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याच्या आजवर अनेक भूमिका गाजल्या आहेत. त्यातलीच एक भूमिका म्हणजे संघर्ष चित्रपटातील. या चित्रपटामध्ये त्याने लज्जा शंकर पांडे ही भूमिका साकारली होती.
    • लहान मुलांचं अपहरण करुन त्यांचा बळी देणं असं एकंदरीत ही भूमिका होती. विशेष म्हणजे यात तो तृतीयपंथी व्यक्ती दाखविण्यात आला होता. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरने सन्मानितही करण्यात आलं होतं.
    • बॉलिवूड गाजवणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे सदाशिव अमरापूरकर. खरंतर त्यांचं निधन होऊन बराच काळ लोटला. मात्र, त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे ते आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
    • पूजा भट्ट आणि संजय दत्त यांच्या सडक या चित्रपटात त्यांनी स्त्री भूमिका साकारली होती.
    • मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी रज्जो या चित्रपटात त़ृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारली होती.
    • बेगम असं त्यांच्या भूमिकेचं नाव होतं. तसंच या चित्रपटात अभिनेत्री कंगना रणौत मुख्य भूमिकेत झळकली होती.
    • परेश रावल यांनी 'तमन्ना' चित्रपटात एका तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे ही भूमिका प्रचंड गाजली होती.
    • प्रशांत नारायणन यांनी इमरान हाश्मी आणि जॅकलिन फर्नांडिज यांच्या 'मर्डर २' या चित्रपटात तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारली.
    • विशेष म्हणजे ही व्यक्ती मनोरुग्ण सीरियल किलर म्हणून दाखविण्यात आली होती.
    • अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात तो पहिल्यांदाच तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारणार आहे.

Web Title: Akshay kumar to ashutosh rana bollywood actors who played transgender in films dcp 98 ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.