-
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा प्रेक्षकंना प्रचंड आवडते. ( सर्व फोटो सौजन्य इन्स्टाग्राम – मुनमुन दत्ता, भव्य गांधी, राजा अनाडकट, सोनिला जोशी, नेहा मेहता)
-
अलीकडे नेहा मेहता आणि काही कलाकारांनी ही मालिका सोडली असली, तरी अजूनही या मालिकेची प्रेक्षकांमध्ये असलेली लोकप्रियता कमी झालेली नाही.
-
माधवी भाभी, भिडे मास्तर, जेठालाल, अय्यर, तारक मेहता ही पात्र विशेष लक्षात राहतात. छोटया-छोटया गोष्टींवरुन त्यांच्यात होणारा संघर्ष प्रेक्षकांना खूप भावतो.
-
या मालिकेतील सर्व कलाकार सोशल मीडियावरही तितकेच सक्रीय आहेत. त्यांचे लाखोमध्ये फॉलोअर्स आहेत. हे कलाकारही आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अपडेट देत असतात.
-
या मालिकेतील सर्वात लोकप्रिय असलेले पात्र म्हणजे टप्पू. मालिकेचे कथानक काही वर्षांनी पुढे गेले, तशी टप्पूची व्यक्तीरेखाही बदलली.
-
आधी भव्य गांधी हे पात्र साकारत होता, आता राज अनादकट टप्पूची भूमिका साकारतो. तीन वर्षांपूर्वी राजा अनादकट या मालिकेचा एक भाग झाला.
-
तारक मेहतामधील आणखी एक लोकप्रिय असलेले पात्र म्हणजे बबिताजी उर्फ अभिनेत्री मुनमुन दत्ता. मुनमुन यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले होते, त्यावरुन त्या मालिकेतील एका कलाकाराला डेट करत असल्याची माध्यमांमध्ये चर्चा झाली होती. जनसत्ताने हे वृत्त दिले आहे.
-
मुनमुन दत्ताने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती आणि राजा अनादकट म्हणजे टप्पू एका रेस्टॉरंटमध्ये स्वादिष्ट अन्न-पदार्थांचा अस्वाद घेत असल्याचे ते फोटो होते. त्यावेळी मुनमुन टप्पूला डेट करते का? अशी चर्चा झाली होती.
-
मुनमुन यांनी शेअर केलेल्या फोटोंवरुन त्यांच्यामध्ये चांगली बाँडिंग आणि मैत्री असल्याचे दिसले होते.
-
बबिता ही व्यक्तिरेखा कायमच चर्चेत असते. मुनमुन दत्ता अभिनयासोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते.
‘तारक मेहता’मधील ‘या’ भाभी बरोबर झाली होती टप्पूच्या अफेअरची चर्चा
Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah actress munmun dutta babita dating her co actor raja anadkat tappu dmp