गेल्या बारा वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेचे निर्माते असित मोदी आहेत तर मालव राजदा हे त्याचे दिग्दर्शक आहेत. अभिनेत्री प्रिया अहुजा या मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारत आहे. २००८ पासून ती या मालिकेत काम करतेय. मालिकेत काम करता करता प्रिया दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली आणि २०११ मध्ये मालव आणि प्रियाने लग्न केलं. प्रियाने २००९ मध्ये 'द स्टोनमॅन मर्डर्स' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिने केके मेनन आणि अरबाज खानसोबत स्क्रिन शेअर केला होता. प्रिया सोशल मीडियावर सक्रिय असून पतीसोबतचे अनेक फोटो ती पोस्ट करत असते. 'तारक मेहता..'शिवाय तिने इतरही मालिकांमध्ये काम केलंय. 'अदालत' या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची वाहवा मिळाली. २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अॅक्सिडेंट ऑन हिल्स'मध्येही तिने भूमिका साकारली आहे.
‘तारक मेहता..’मधल्या ‘रिटा रिपोर्टर’ने केलं दिग्दर्शकासोबतच लग्न
Web Title: Taarak mehta ka oolta chashma fame priya ahuja asit modi actress get married with director ssv