• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. malaika arora hot yoga photo viral mppg

ये फिटनेस की बात है! पाहा मलायकाचा ‘हॉट योगा’

Updated: September 9, 2021 18:37 IST
Follow Us
  • शरीर आणि मनाचं संतुलन हवं असेल तर व्यायाम करणं आवश्यक आहे. त्यातही मनाच्या संतुलनासाठी योगसाधना केली तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या शरीरावर होतो. (photo credit instagram)
    1/20

    शरीर आणि मनाचं संतुलन हवं असेल तर व्यायाम करणं आवश्यक आहे. त्यातही मनाच्या संतुलनासाठी योगसाधना केली तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या शरीरावर होतो. (photo credit instagram)

  • 2/20

    बॉलिवूडमधील अनेक कलाकार आपलं शरीर संतुलीत ठेवण्यासाठी दररोज योग आणि व्यायाम करतात. (photo credit instagram)

  • 3/20

    अभिनेत्री मलायका अरोरादेखील स्वत:चं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज योगसाधना करते. (photo credit instagram)

  • 4/20

    लक्षवेधी बाब म्हणजे ती सोशल मीडियावर विविध प्रकारचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करुन व्यायामाचं महत्व आपल्या चाहत्यांनाही समजावून सांगते. (photo credit instagram)

  • 5/20

    नुकतेच तिने योग साधना करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (photo credit instagram)

  • 6/20

    हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. (photo credit instagram)

  • 7/20

    ‘योग’ या शब्दाचा उगम ‘युज’ या धातूपासून झाला आहे. याचा अर्थ संयोग होणे असा होतो. (photo credit instagram)

  • 8/20

    भारतीय अध्यात्माच्या दृष्टीने ‘योग’ या शब्दाचा अर्थ ‘परमात्मा’ आणि ‘जीवात्मा’ यांचा एकत्र संयोग होणे, जीवात्माचे परमात्म्याशी मीलन होणे असा होतो. (photo credit instagram)

  • 9/20

    योग ही जीवनशैली आहे. ‘योग’ ही भारताने जगाला दिलेली मोठी देन आहे. (photo credit instagram)

  • 10/20

    भारतात उगम पावलेली योग विज्ञानाची सरिता आता विश्वाच्या कानाकोपऱ्यात सर्वदूर पसरली आहे. (photo credit instagram)

  • 11/20

    तत्त्वज्ञानाचा व्यापक आणि सखोल मूलाधार असलेले हे शास्त्र काहींनी आध्यात्मिक वळणांनी पुढे नेले तर अनेकांनी त्याचा व्याधीमुक्ती तंत्राच्या अंगांवर भर देऊन उपयोजित योगशास्त्र म्हणून विकसित केले. (photo credit instagram)

  • 12/20

    त्यामुळेच ज्ञानयोग, भक्तियोग, राजयोगपासून हठयोग, ते पॉवर योगापर्यंत ज्यांना जसे भावले त्याप्रमाणे त्यांनी पुढे नेले. (photo credit instagram)

  • 13/20

    भारतातील योग परंपरा पंधराशे वर्षे जुनी आहे, असे मानले जाते. (photo credit instagram)

  • 14/20

    महर्षी पतंजलींच्या महत्त्वपूर्ण योगसूत्राच्या आधीदेखील काही शतके योगविद्येचे विविध प्रकार आणि प्रवाह भारतवर्षांत होते. (photo credit instagram)

  • 15/20

    पतंजली योगशास्त्रात सूत्रे पूर्णपणे मानसशास्त्राच्या दृष्टीने ‘शांत प्रगल्भ चित्तवृत्ती’भोवती केंद्रित केली गेली आहेत. (photo credit instagram)

  • 16/20

    यात आसनांना दुय्यम स्थान आहे. तरंगहीन सरोवराप्रमाणे चित्त शांत झाल्यानंतर पुढच्या अवस्था गाठता येतात. (photo credit instagram)

  • 17/20

    अंतिम अवस्था समाधी म्हणजे चित्त आणि शरीराची तात्पुरती फारकत करणे. (photo credit instagram)

  • 18/20

    विवेकानंदांनी ज्याला ‘राजयोग’ म्हटले तो ‘अष्टांगयोग’ आहे. या अष्टांगयोगात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी या आठ पायऱ्या सांगितल्या आहेत. (photo credit instagram)

  • 19/20

    शारीरिक आरोग्यासोबतच मनाचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. आरोग्य रक्षणासाठी आणि शारीरिक व्याधी टाळण्यासाठी योगशास्त्र आणि योग जीवनशैली खूप उपयुक्त ठरते. (photo credit instagram)

  • 20/20

    शारीरिक योगशास्त्र म्हणजे कमीतकमी कष्टात स्नायुबळ फारसे न वापरात, हृदय किंवा श्वासगती न वाढवता करायचे संथगतिशील किंवा जास्त करून स्थितिशील पद्धती आहे. (photo credit instagram)

Web Title: Malaika arora hot yoga photo viral mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.