-
करोना व्हायरसमुळे जगातील बहुतांश देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्वांनाच सक्तीने घरातच थांबावे लागले. यामध्ये बॉलिवूड कलाकार, सेलिब्रिटी सुद्धा होते. (सर्व फोटो सौजन्य – प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम)
-
कामाच्या व्यस्ततेमुळे ज्या सेलिब्रिटींना, कलाकारांना जास्त वेळ घरी देता येत नाही, त्यांनी सुद्धा कुटुंबीयांसोबत चांगला दर्जेदार वेळ व्यतीत केला.
-
अनेक कलाकारांनी लॉकडाऊन पथ्यावर पडल्याची, चांगला क्वालिटी टाइम कुटुंबीयांसोबत व्यतीत केल्याची भावना व्यक्त केली.
-
देसी गर्ल प्रियांका चोप्राने निक जोनाससोबत विवाह केल्यामुळे आता ती अमेरिकेत वास्तव्याला आहे. तिथे सुद्धा करोनामुळे लॉकडाऊन होते. त्यामुळे प्रियांका आणि निकने बराचवेळ एकत्र घालवला.
-
आता निकने एका मुलाखतीत लॉकडाऊनच्या दिवसातला प्रियांकासोबतचा अनुभव कसा होता? त्यांनी एकत्र वेळ कसा घालवला? त्याबद्दल सांगितले आहे.
-
करोना व्हायरस नसता, तर आम्हाला इतका चांगला एकत्र क्वालिटी टाइम घालवणे शक्य झाले नसते, असे निक जोनास म्हणाला.
-
लॉकडाऊनमध्ये मी आणि प्रियांका एकत्र होतो. हा सुद्धा एक चांगला अनुभव होता. आमच्या ज्या कल्पना आहेत, त्यावर आम्ही बराच वेळ चर्चा केली. परस्परांशी आमच्या आयडिया शेअर केल्या. आम्ही दोघे एकत्र अनेक गोष्टींवर काम करतोय असे निक म्हणाला.
-
प्रियांका चोप्राचा पती निक जोनास काका बनल्यामुळे सध्या उत्साहात आहे. निकचा भाऊ जोई जोनास आणि त्याची पत्नी सोफी टर्नरने पुन्हा एकदा आई-बाबा बनले आहेत. सोफी टर्नरने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
-
बॉलिवूडमध्ये नाव, यश कमावल्यानंतर प्रियांका आता हॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
-
निक आणि प्रियांका हे जोडपे नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर एखाद्या कार्यक्रमातील प्रियांकाच्या लूकचीही चर्चा होते.
लॉकडाऊनमध्ये प्रियांकाने पती सोबत कसा घालवला वेळ? निकने सांगितला अनुभव
Web Title: Nick jonas also talked about how quarantining with priyanka chopra dmp