-
आज दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा ७०वा वाढदिवस आहे. त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. रजनीकांत यांच्या वाढदिवशी चला जाणून घेऊया त्यांच्या विषयी काही खास गोष्टी…
-
रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० साली बंगळूरू मध्ये एका मराठी कुटूंबात झाला होता.
-
रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे.
-
रजनीकांत यांचे वडील रामोजीराव गायकवाड हे हवलदार होते. त्यांच्या आईच नाव जिजाबाई आहे. रजनीकांत लहान असतांना त्यांच्या आईचे निधन झाले.
-
रजनीकांत यांना चार भावंडे. आईच्या मृत्युनंतर रजनीकांत यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. त्यांनी काम करण्यास सुरुवात केली.
-
काही दिवसांनंतर त्यांनी ‘बेंगळुरू मेट्रॉपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’मध्ये ‘कंडक्टर’ म्हणून काम करायला सुरुवात केली.
-
बस कंडक्टर म्हणून रजनीकांत हे खूप लोकप्रिय होते. तिकीट देण्याची अनोख्या स्टाइलमुळे ते लोकप्रिय होते.
-
रजनीकांत यांना अभिनयाची आवड होती त्यामुळे त्यांनी नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
-
आपल्याला जे आवडते त्यात करिअर करण्यासाठी रजनीकांत यांनी नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी अभिनयाचे धडे घेण्यास सुरुवात केली.
-
एका नाटकादरम्यान प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक के. बालाचंद्र यांनी रजनीकांत यांना पाहिले आणि त्यांनी रजनीकांत यांना चित्रपटाची ऑफर दिली
-
रजनीकांत यांनी १९७५ मध्ये ‘अपूर्व रागंगल’ या तामिळ चित्रपटाद्वारे कलाविश्वात पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. कमल हसन यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात रजनीकांत यांना केवळ १५ मिनीटांची भूमिका मिळाली होती..
-
रजनीकांत यांनी एथिरात कॉलेजच्या विद्यार्थिनी लता यांच्याशी लग्न केले. लता कॉलेजच्या मॅगझीनसाठी रजनीकांत यांची मुलाखत घेण्यासाठी गेल्या होत्या आणि पहिल्याच भेटीत रजनीकांत लताच्या प्रेमात पडले.
-
रजनीकांत आणि लता यांनी २६ फेब्रुवारी १९८१ रोजी आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिरात लग्न केलं.
-
रजनीकांत यांना दोन मुली आहेत. ऐश्वर्या रजनीकांत आणि सौंदर्या रजनीकांत. त्यांच्या पत्नी 'द आश्रम' नावाची शाळा चालवतात.
कंडक्टर ते सुपरस्टार, रजनीकांत यांच्या विषयी काही खास गोष्टी
Web Title: From a bus conducter to an actor know some unknown facts about the mega start rajnikant dcp 98 avb