कलाविश्वात सेलिब्रिटींच्या प्रोफेशनल लाइफबरोबरच त्यांची पर्सनल लाइफदेखील तितकीच चर्चेत येत असते. यात अनेकदा त्यांची लव्हलाइफ, रिलेशनशीप, ब्रेकअप यांच्या चर्चा रंगतात. सध्या सोशल मीडियावर चर्चां रंगली आहे ती अभिनेत्री स्वरा भास्करच्या एक्स बॉयफ्रेंडची. (सौजन्य : कनिका ढिल्लन / स्वरा भास्कर इन्स्टाग्राम पेज.) स्वरा भास्करच्या एक्स बॉयफ्रेंडने म्हणजेच हिमांशू शर्माचा नुकताच साखरपुडा झाला आहे. हिमांशूने मुव्ही रायटर कनिका ढिल्लनसोबत साखरपुडा केला असून त्यांचे फोटो कनिकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती हिमांशू व कनिकाने साखरपुडा केला. या सोहळ्यावेळी कनिकाने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर हिमांशुने निळ्या रंगाचा कुर्ता -पायजामा घातला होता. #Famjam and more .. with #himanshusharma, असं कॅप्शन कनिकाने या फोटोला दिलं आहे. मागील एक वर्षापासून कनिका आणि हिमांशू एकमेकांना डेट करत होते. अखेर या दोघांनी साखरपुडा करत हे नातं अधिकृतरित्या जाहीर केलं आहे. कनिकापूर्वी हिमांशू स्वरा भास्करला डेट करत होता. मात्र, काही कारणास्तव त्यांच्या नात्यात दुरावा आला व ते विभक्त झाल्याचं सांगण्यात येतं. कनिकाने यापूर्वी फिल्ममेकर प्रकाश कोवलामुडीसोबत लग्न केलं होतं. मात्र, २०१९ मध्ये ते विभक्त झाले. हिमांशू हा कलाविश्लातील लोकप्रिय स्टोरी रायटर आहे. त्याने तनु वेड्स मनु, तनु वेड्स मनु रिटर्न्स आणि रांझनासारखे सिनेमे लिहिले आहेत. कनिका ढिल्ललने मनमर्जिया, केदारनाथ, जजमेंटल है क्या आणि गिल्टीसारखे सिनेमेही लिहिले आहेत. -
स्वरा भास्कर
स्वरा भास्करच्या एक्स बॉयफ्रेंडने केला प्रेयसीसोबत साखरपुडा; पाहा फोटो
Web Title: Writer kanika dhillon engaged himanshu sharma pics viral social media ssj