-
रकूल प्रित सिंह ही एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. गेल्या काही काळात बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणामुळे ती चर्चे होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या निमित्तानं सुरु झालेल्या तपासात सारा अली खान, अर्जुन रामपाल, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दिया मिर्झा, अबिगल पांडे, भारती सिंह यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली. यापैकी एक नाव रकुल प्रित सिंह हिचं देखील होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु अखेर तिच्याविरोधात कुठलाही पुरावा न सापडल्यामुळे एनसीबीनं तिला निर्दोष मुक्त केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु या दरम्यान तिच्यावर सोशल मीडियाद्वारे जोरदार टीका करण्यात आली. तिच्या चित्रपटांवर बंदी घालण्याची मगणी देखील काही संतापेल्या नेटकऱ्यांनी केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लक्षवेधी बाब म्हणजे इतकं आक्रमक ट्रोलिंग होऊन सुद्धा रकूल बिथरली नाही. किंवा तिने कुठलंही वादग्रस्त वक्तव्य या दरम्यान केलं नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अलिकडेच समंथा अक्किनेनीच्या चॅट शोमध्ये तिने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने तिच्याविरोधात झालेल्या ट्रोलिंगवर भाष्य केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ती म्हणाली, "मी ट्रोलर्सला फार महत्व देत नाही. मी केवळ स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवते व अफवांकडे दुर्लक्ष करते. कारणशिवाय उगाचच कोणावर टीका करण्यासाठी माझ्याकडे ट्रोलर्सप्रमाणे रिकामा वेळ नाही." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"जेव्हा कुठल्याही पुराव्यांअभावी काही नेटकरी माझ्यावर टीका करत होते तेव्हा मी माझ्या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त होते. त्यामुळे मला या गोष्टींचा फार फरक पडला नाही. ज्यांना अजूनही वाटतं मी ड्रग्ज घेते त्यांनी पुरावे गोळा करुन सिद्ध करावं अन् पोलिसांकडे माझी तक्रार करावी." अशा प्रकारे समंथा ट्रोलर्सचा सामना करते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
रकूल येत्या काळात 'इंडियन २' या दाक्षिणात्य चित्रपटात झळकरणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या चित्रपटात कमल हासन मुख्य व्यक्तिरेखा साकारणार असून एप्रिल २०२१ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
ड्रग्जवरुन ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं खुलं आव्हान; सिद्ध करा अन्…
Web Title: Rakul preet singh bollywood drugs case mppg