सोशल मीडिया असो किंवा एखादा रिअॅलिटी शो सध्याच्या घडीला प्रसिद्धी मिळवण्याचं हे एक उत्तम माध्यम झालं आहे.परंतु, प्रसिद्धी मिळवल्यानंतरही ती लोकप्रियता कायम राखून ठेवणं हे खरं कौशल्य आहे. विशेष म्हणजे ही लोकप्रियता जपून ठेवण्यास यशस्वी ठरली ती म्हणजे प्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन. ( सौजन्य :मुग्धा वैशंपायन इन्स्टाग्राम पेज) 'लिटिल चॅम्प' या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचली मुग्धा आजही लोकप्रिय गायिकांपैकी एक असल्याचं दिसून येतं. -
लहानपणापासूनच कलाविश्वात वावर असलेली मुग्धा आता मोठी झाली आहे. त्यामुळे आता ही चिमुकली नेमकी कशी दिसते, ती काय करते असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मुग्धा आता मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायिका झाली असून तिने अनेक म्युझिक अल्बमसाठी गाणी गायली आहेत. मुग्धा शास्त्रीय संगीतामध्ये सध्या करिअर करत असल्याचं सांगण्यात येतं. मुग्धाचं 'मुग्धा वैशंपायन ऑफिशियल’ हे युट्यूब चॅनेलदेखील आहे. मूळ अलिबागची असलेली मुग्धा आता मुंबईमध्ये स्थायिक झाली आहे. मुग्धाने दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण अलिबागमध्ये घेतलं असून पुढील शिक्षण तिने मुंबईतील रुपारेल कॉलेजमध्ये केलं आहे. मुग्धाला ट्रेकिंग, स्विमिंग आणि सायकलिंग करण्याची आवड आहे. -
मुग्धाचं निखळ हास्य
-
मुग्धाला साडी नेसण्याची विशेष आवड असल्याचं दिसून येतं.
ती सध्या काय करते? ‘लिटिल चॅम्प’मधील मुग्धा वैशंपायन आठवते का?
Web Title: Little champ fame mugdha vaishampayan photos ssj