-
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व अभिनेत्री मिताली मयेकर यांच्या घरात लगीनघाई सुरू झाली आहे.
नवीन वर्षात हे दोघं लग्नगाठ बांधणार असून त्यापूर्वी केळवण आणि इतर कौटुंबिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. सिद्धार्थ आणि मिताली याचे फोटो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. अभिनेत्री इशा केसकरच्या घरी पार पडलेलं सिद्धार्थ-मितालीचं केळवण कुटुंबीयांसोबत सिद्धार्थ-मितालीचं एकत्र जेवण -
या सर्व कार्यक्रमांमध्ये मितालीचा पारंपरिक लूक पाहायला मिळाला.
-
लग्नाआधी वधू-वरांसाठी केलं जाणारं केळवण हे तर सगळ्यांनी एकत्र भेटण्याचं निमित्त असतं.
-
लग्नाच्या तयारीची खरी तर सुरुवात या केळवणापासून सुरू होते.
-
वधू-वरांच्या आवडीचे पदार्थ करून जेवणासाठी पाहुण्यांकडे आमंत्रित केलं जातं. त्यानंतर एखादी भेटवस्तू देऊन लग्नाबाबत शुभेच्छा दिल्या जातात.
-
सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, सिद्धार्थ-मिताली
केळवण आणि बरंच काही.. सिद्धार्थ-मितालीच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात
Web Title: Siddharth chandekar and mitali mayekar pre wedding kelvan and family gathering ssv