कलाविश्वात सेलिब्रिटींच्या प्रोफेशनल लाइफबरोबरच त्यांची पर्सनल लाइफदेखील तितकीच चर्चेत येत असते. यात अनेकदा त्यांची लव्हलाइफ, रिलेशनशीप, ब्रेकअप यांच्या चर्चा रंगतात. (सौजन्य : कनिका ढिल्लन इन्स्टाग्राम पेज.) सध्या सोशल मीडियावर चर्चां रंगली आहे ती अभिनेत्री स्वरा भास्करच्या एक्स बॉयफ्रेंड हिमांशू शर्माच्या लग्नाची. अलिकडेच हिमांशूने प्रेयसी कनिका ढिल्लन हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. कनिकाने तिच्या इन्स्टाग्रावर या लग्नसोहळ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. अत्यंत साध्या पद्धतीने कनिका व हिमांशूने लग्नगाठ बांधली आहे. डिसेंबर २०२० मध्ये या दोघांनी साखरपुडा केला होता. त्यानंतर नव्या वर्षात या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. कनिका ढिल्लन ही मुव्ही रायटर आहे. मागील एक वर्षापासून कनिका आणि हिमांशू एकमेकांना डेट करत होते. अखेर या दोघांनी लग्न केलं आहे. कनिकापूर्वी हिमांशू स्वरा भास्करला डेट करत होता. मात्र, काही कारणास्तव त्यांच्या नात्यात दुरावा आला व ते विभक्त झाल्याचं सांगण्यात येतं. कनिकाने यापूर्वी फिल्ममेकर प्रकाश कोवलामुडीसोबत लग्न केलं होतं. मात्र, २०१९ मध्ये ते विभक्त झाले. हिमांशू हा कलाविश्वातील लोकप्रिय स्टोरी रायटर आहे. त्याने तनु वेड्स मनु, तनु वेड्स मनु रिटर्न्स आणि रांझनासारखे सिनेमे लिहिले आहेत. कनिका ढिल्ललने 'मनमर्जिया', 'केदारनाथ', 'जजमेंटल है क्या' आणि 'गिल्टीसारखे सिनेमेही लिहिले आहेत.
स्वरा भास्करच्या एक्स बॉयफ्रेंडने बांधली प्रेयसीसोबत लग्नगाठ; पाहा फोटो
Web Title: Bollywood writer kanika dhillon ties the knot with himanshu sharma ssj