-
‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळते. या मालिकेत रघू ही भूमिका साकारणाऱ्या संचित चौधरीचा अभिनयाचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे.
-
संचित मुळचा नागपूरचा.
-
वडिल शिक्षक असल्यामुळे संचितनेही शिक्षक व्हावं अशी त्यांची इच्छा होती.
-
संचितने सायकॉलॉजीमध्ये एम ए केलं आणि दोन वर्ष प्रोफेसर म्हणून सरकारी शाळेत नोकरीही केली.
-
संचितला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.
-
टीव्हीवरचे कॉमेडी शोज पाहून तो स्क्रीप्ट लिहायचा आणि शाळेत परफॉर्म करायचा.
-
दहावीनंतर मात्र त्याला काही स्पर्धांविषयी कळलं. मग त्याने नागपूरातला रंगरसिया थिएटर ग्रुप जॉईन केला.
-
त्यानंतर राज्यनाट्य, पुरुषोत्तम करंडक, प्रबोधन करंडक, सवाई, लोकांकिका या नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेत घेत तो मुंबईत पोहोचला.
-
मुंबईत पृथ्वी थिएटरमध्ये त्याने बरेच प्ले सादर केले.
-
बरेच वर्कशॉप्सही तो घेत होतो.
-
हिंदी आणि मराठीसाठी डबिंग आर्टिस्ट म्हणूनही त्याने काम केलं. नोकरी करता करता हे सर्व चालू होतं.
-
अभिनय क्षेत्राची आवड असलेल्या संचितला नोकरीत काहीच रस नव्हता.
-
त्यामुळे सरकारी नोकरी सोडून त्याने पूर्णपणे अभिनय करण्याचा निर्णय घेतला.
-
सुरुवातीला घरातून विरोध झाला मात्र त्याच्या हट्टापायी वडिलांनीही साथ दिली.
-
स्टार प्रवाहवरील प्रेमाचा गेम सेम टू सेम मालिकेत दुहेरी व्यक्तिरेखा साकारल्यानंतर आता संचित तुझ्या इश्काचा नादखुळा या मालिकेत रघूच्या भूमिकेत दिसत आहे.
सरकारी नोकरी ते अभिनेता, ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’मधील रघूचा थक्क करणारा प्रवास
जाणून घ्या त्याच्या विषयी खास गोष्टी..
Web Title: Actor sanchit chaudhary left teacher job and become actor avb