-
बॉलिवूडचा स्टार वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल उद्या २४ जानेवारीला अलिबागच्या 'द मॅन्शन हाऊस'मध्ये विवाहबद्ध होणार आहेत. खरंतर आजपासूनच या विवाहसोहळयाचे विधी सुरु झाले आहेत. ( फोटो सौजन्य – वरुण धवन)
-
दीपिका-रणवीर किंवा विराट-अनुष्काने इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केले होते. मग वरुणने लग्नासाठी मुंबई जवळच्या अलिबागची निवड का केली असावी? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.
-
खरंतर लग्न ही आयुष्यभरासाठीची एक सुंदर आठवण असते. त्यामुळे प्रत्येक जण या दिवसाला अधिक खास कसं बनवता येईल, याचा विचार करतो.
-
वरुण भले अलिबागमध्ये लग्न करत असला, तरी ज्या 'द मॅन्शन हाऊस'मध्ये त्याचे लग्न होणार आहे. ती वास्तू सुद्धा तितकीच सुंदर आणि आलिशान आहे. याच 'द मॅन्शन हाऊस'ची आपण वैशिष्टय जाणून घेऊया. ( सर्व फोटो सौजन्य – themansionhouse.alibaug)
-
वरुणचे कुटुंबीय आधीच 'द मॅन्शन हाऊस'मध्ये दाखल झाले असून आता त्याचा बॉलिवूडमधील मित्र परिवार अलिबागमध्ये दाखल होतोय. इथे गर्दी होऊ शकते, ही शक्यता लक्षात घेऊन कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
-
'द मॅन्शन हाऊस' एक बीच रिसॉर्ट आहे. ही एक निर्सगरम्य, मनमोहक, जागा आहे. इथे पाऊल ठेवताच तुमचं मन प्रसन्न होईल.
-
नारळाच्या झाडाची बाग, सभोवतालचा हिरवाईने नटलेला परिसर मनाला प्रसन्न करतो. अलिबागच्या सासवणे बीचपासून 'द मॅन्शन हाऊस' खूपच जवळ आहे. बीचवरुन तुम्ही इथे चालत जाऊ शकता.
-
या मॅन्शन हाऊसमध्ये २५ रुम्स आहे. सर्व खोल्या अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त आहेत.
-
अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, ३७५ ते ४५० चौरस फुटाच्या या खोल्या आहेत. प्रत्येक खोलीमध्ये पाहुण्यांच्या स्वागतासाठी टेडी बेअर ठेवला आहे.
-
कंपन्यांच्या कॉन्फरन्स, गेट-टुगेदर ते पार्टीसाठी मॅन्शन हाऊस बुक केले जाते. इथे प्रत्येक कार्यक्रमाची मागणीनुसार, व्यवस्था केली जाते.
-
डोळयाला सुखावणाऱ्या सौंदर्याबरोबरच इथे तुम्हाला रुचकर खाद्यपदार्थांचाही अस्वाद घेता येतो. सकाळच्या ब्रेक फास्टपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत स्थानिक पदार्थांबरोबर अन्य खाद्यपदार्थांची निराळी चव अनुभवता येते.
-
मुंबईहून स्पीड बोटने 'द मॅन्शन हाऊस' २० मिनिटांच्या अंतरावर आहे. मांडवा जेट्टीपासून हे ठिकाण पाच मिनिटांवर आहे.
-
'द मॅन्शन हाऊस' बुक करण्याचा एका दिवसाचा किती खर्च असावा? असा प्रश्न तुमच्या मनात असेल.
-
cntraveller.in नुसार, संपूर्ण एक दिवसासाठी 'द मॅन्शन हाऊस' बुक करण्याचा खर्च चार लाख रुपये आहे. यात जेवणाचा सुद्धा समावेश आहे. वरुणच्या लग्नासाठी खास तीन दिवसांसाठी 'द मॅन्शन हाऊस' बुक करण्यात आलेय. त्यामुळे १२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
-
ढिशुम चित्रपटात वरुण सोबत काम करणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसलाही या लग्नाचे निमंत्रण देण्यात आले आहे. (Photo: File/Jacqueline Fernandez/Instagram; designed by Gargi Singh)
वरुण नताशाचं अलिबागमध्ये लग्न: ‘द मॅन्शन हाऊस’चं एका दिवसाचं भाडं ऐकून विस्फारतील डोळे
Web Title: Know every thing about varun natasha wedding destination the mansion house dmp