• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • पाऊस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. republic day 2021 bollywood 5 patriotic movies ssj

Republic Day 2021 : देशभक्तीवर आधारित ‘हे’ पाच बॉलिवूड चित्रपट पाहिलेत का?

Updated: September 9, 2021 00:36 IST
Follow Us
    • संपूर्ण देशभरात आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र आनंदाचं आणि मांगल्याचं वातावरण पसरलं आहे. हा देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक जवानांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे आजही या शुरवीरांच्या यशोगाथा सांगितल्या जातात. बॉलिवूडमध्ये देखील या मुद्द्यावर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे देशभक्तीवर आधारित चित्रपट कोणते ते पाहुयात.
    • क्रांती – मनोज कुमार, दिलीप कुमार, शत्रघ्न सिन्हा, परवीन बाबी, शशी कपूर, हेमा मालिनी यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये स्वातंत्र्यापूर्वीचा काळ दाखविण्यात आला आहे.
    • रंग दे बसंती – राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित रंग दे बसंती हा चित्रपट देशभक्तीवर आधारित असून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी, सिद्धार्थ आणि सोहा अली खान हे कलाकार झळकले आहेत.
    • बॉर्डर – १३ जून १९९७ मध्ये प्रदर्शित झालेला बॉर्डर हा चित्रपट भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये सिमेवर लढणारे जवान, त्यांचा संघर्ष आणि कुटुंबाप्रतीची ओढ उत्तमरित्या मांडण्यात आली आहे. या चित्रपटातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली असून आजही ही गाणी प्रत्येक भारतीयांच्या ओठी दिसून येतात. या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार झळकले असून सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, राखी, पूजा भट्ट, पुनित इस्सर यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
    • मंगल पांडे – स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे यांच्या जीवनावर आधारित मंगल पांडे हा चित्रपट आहे. या चित्रपटमध्ये आमिर खान प्रमुख भूमिकेत झळकला असून त्याच्या लूकची विशेष चर्चा रंगली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही.
    • स्वदेश – आशुतोष गोवारीकर यांच्या स्वदेशमध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. शाहरुखने नासामधील एका वैज्ञानिकाची भूमिका वठविली असून आपल्या गावाच्या विकासासाठी तो नोकरी सोडून गावी जातो. हा चित्रपट १७ डिसेंबर २०१४ ला प्रदर्शित झाला होता.
TOPICS
प्रजासत्ताक दिन २०२५Republic Day 2025

Web Title: Republic day 2021 bollywood 5 patriotic movies ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.