Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. jasprit bumrah is set to marry sanjana ganesan the sports anchor dcp

Miss India ते Mrs Bumrah… जाणून घ्या जसप्रीत बुमराहच्या होणाऱ्या पत्नीबद्दलच्या खास गोष्ट

Updated: September 9, 2021 00:32 IST
Follow Us
  • भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अहमदाबादमध्ये झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या व अखेरची कसोटी खेळला नाही. २८ वर्षीय बुमराह लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचंही सुत्रांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे बुमराहच्या सुट्टीचं खरं कारण समोर आल्यानंतर त्याचं नाव आता एका स्टार अॅंकर आणि मॉडेलशी जोडलं जात आहे. जाणून घेऊया कोण आहे जसप्रीतची होणारी पत्नी...
    1/12

    भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अहमदाबादमध्ये झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या व अखेरची कसोटी खेळला नाही. २८ वर्षीय बुमराह लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचंही सुत्रांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे बुमराहच्या सुट्टीचं खरं कारण समोर आल्यानंतर त्याचं नाव आता एका स्टार अॅंकर आणि मॉडेलशी जोडलं जात आहे. जाणून घेऊया कोण आहे जसप्रीतची होणारी पत्नी…

  • 2/12

    जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन या आठवड्यात विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र या संदर्भात दोघांनीही अद्याप मौन बाळगलं आहे.

  • 3/12

    जसप्रीत आणि संजना १४-१५ मार्चला गोव्यात लग्न करणार असल्याची चर्चा आहे. करोनाच्या संकटामुळे मोजक्या आणि जवळच्या लोकांना या लग्नासाठी बोलवण्यात येणार आहे.

  • 4/12

    क्रिकेट चाहत्यांमध्ये संजना खूपच लोकप्रिय आहे. संजना अभिनेत्रीं इतकीच सुंदर असल्याने क्रिकेट चाहते तिची तुलना अनेक अभिनेत्रींशी करतात.

  • 5/12

    संजना गणेशला 'स्प्लिट्स व्हिला ७' या रिअॅलिटी शोमुळे लोकप्रियता मिळाली.

  • 6/12

    संजना टिव्ही प्रेझेंटर होण्याआधी एक मॉडल होती. संजनाने 'फेमिना ऑफिशियली गॉर्जियस' हा खिताब जिंकला होता. त्यानंतर २०१२ मध्ये तिने 'फेमिना स्टाइल दिवा'मध्ये भाग घेतला होता.

  • 7/12

    २०१४ मध्ये संजना 'फेमिना मिस इंडिया पुणे' या स्पर्धेची फायनलिस्ट ठरली होती.

  • 8/12

    संजनाने २०१९मध्ये क्रिकेट विश्वचषकात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर 'मॅच पॉईंट' आणि 'चिक सिंगल' या शोचे सुत्रसंचालन केले होते.

  • 9/12

    संजनाने प्रीमियर बॅडमिंटन लीग (पीबीएल) चे सुत्रसंचालन केले होते. यामुळे सोशल मीडियावरील तिचे चाहते देखील वाढले होते.

  • 10/12

    संजनाने स्टार स्पोर्ट्ससाठी 'दिल से इंडिया' या सेगमेंटचेही सुत्रसंचालन केले.

  • 11/12

    संजना आयपीएल टीम केकेआरच्या चाहत्यांसाठी 'द नाईट क्लब' नावाच्या एका खास इंटरएक्टिव शोचे सुत्रसंचालन करत होती.

  • 12/12

    जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन १४ मार्च आणि १५ मार्च रोजी गोवामध्ये विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र या संदर्भात दोघांनीही अद्याप मौन बाळगलं आहे. (सर्व फोटो: instagram/sanjanaganesan वरुन साभार)

TOPICS
क्रिकेटCricketजसप्रीत बुमराहJasprit Bumrah

Web Title: Jasprit bumrah is set to marry sanjana ganesan the sports anchor dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.