-
90 च्या दशकात काही सिनेमांमधून झळकलेली अभिनेत्री आणि सलमान खानची एक्स गर्लफ्रेण्ड सोमी अली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोमी अलीने एका मुलाखतीत पुन्हा एकदा तिच्या आणि सलमान खानच्या अफेअरबद्दल एक खुलासा केला आहे.
-
सलमान खान आणि सोमी आठ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.
-
त्यावेळी दोघांच्या अफेअरच्या मोठ्या चर्चा होत्या. मात्र आठ वर्षांनंतर ब्रेकअप झाल्याने सोमीने बॉलिवूड आणि देशाचा निरोप घेतला. ती देशाबाहेर गेली.
-
मात्र नुकत्याच झूमला दिलेल्या एका मुलाखतीत तिने सलमान आणि तिच्या नात्याचा खुलासा केला आहे.
-
20 वर्षांपूर्वी सलमाननेन चीट केल्यामुळे ब्रेकअप झाल्याचं सोमीने म्हंटल आहे. सलमान मला फसवत असल्याचं कळाल्याने मी त्याच्यापासून दूर गेले असं ती म्हणाली.
-
सोमी फक्त सलमान खानशी लग्न करण्यासाठी भारतात आली होती. तेव्हा ती फक्त 16 वर्षांची होती.
-
सुरुवातीला तिने मॉडलींग केली. त्यानंतर तिला काही सिनेमांमध्ये काम मिळालं. सलमान आणि तिची भेट झाल्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.
-
सोमी 17 वर्षांची असताना तिने सलमानला डेट करायला सुरुवात केली. आठ वर्ष दोघही नात्यात होते.
-
1999 मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी सोमी अमेरिकेत गेली.
-
सोमीने कृष्णा अवतार , यार गद्दार , तीसरा कौन? यासारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
-
या काळात सलमान खानच्या आयुष्यात एश्वर्या राय आल्याने सोमी आणि सलमानचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होत्या.
-
सोमी सध्या मियामी इथं राहते. 'नो मोर टियर' नावाची ती संस्था चालवते ही संस्था मानवी तस्करी आणि घरगुती हिंसेंचे बळी ठरलेल्यांसाठी काम करते.
-
सोमी सोशल मीडियावर सक्रिय असून ती अनेक सामाजिक कार्यात सहभागी होत असल्याच्या पोस्ट तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पाहायला मिळतात.
-
तसचं सोमी तिचे ग्लॅमरस अंदाजातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअऱ करत असते.
-
भारत सोडून गेल्यानंतर सोमीने पुन्हा बॉलिवूडकडे वळून पाहिलं नाही. बॉलिवूडमध्ये आपण फिट बसत नसल्याचं तिचं म्हणणं आहे. शिवाय सलमानसाठी बॉलिवूडमध्ये ती आली होती त्यामुळे आता पुन्हा बॉलिवूडमध्ये येण्याची इच्छा नाही असं ती म्हणाली. (all photos-instagram@realsomyali)
“सलमानने विश्वासघात केला होता म्हणून…; ब्रेकअपवर एक्स गर्लफ्रेण्ड सोमी अलीचा खुलासा
कुणासाठी सलमानने सोमीला सोडलं?
Web Title: Salman khan ex girlfriend somy ali on their breakup salman cheated on me kpw