• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. birthday special bollywood actor ajay devgn unknown information and stunning photos sdn

Birthday Special : अजय देवगणविषयी काही खास गोष्टी

Updated: September 9, 2021 00:29 IST
Follow Us
  • बॉलिवूडमध्ये तब्बल दोन दशके अधिराज्य गाजविणऱ्या अजयचा आज वाढदिवस. (सर्व फोटो सौजन्य : अजय देवगण / इन्स्टाग्राम)
    1/15

    बॉलिवूडमध्ये तब्बल दोन दशके अधिराज्य गाजविणऱ्या अजयचा आज वाढदिवस. (सर्व फोटो सौजन्य : अजय देवगण / इन्स्टाग्राम)

  • 2/15

    नव्वदच्या दशकात सुरुवातीला अजय देवगणने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले.

  • 3/15

    या पहिल्या चित्रपटातील अभिनयाबद्दल त्याला पदार्पणातील सर्वोकृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

  • 4/15

    अजयने या पदार्पणाच्या चित्रपटातून बॉलिवू़डमधील ‘लंबी रेस का घोडा..’ असल्याचे संकेतच त्याने दिले. ‘प्रेमी, आशिक, आवारा….’ या गाण्यावेळी त्याने केलेल्या बाइकवरील स्टंटची चांगलीच चर्चा रंगली. ‘स्वत:ला प्रेमी, आशिक, आवारा..’ असे सांगणाऱ्या अजयच्या अंगी अ‍ॅक्शन हिरोचे दिसलेले ते गुणच होते.

  • 5/15

    त्यानंतर ‘जिगर’ चित्रपटात त्याची अफलातून अ‍ॅक्शन पाहायला मिळाली. करिश्मा कपूरसोबतच्या अजयचा ही चित्रपटही चांगलाच गाजला. त्यानंतर त्याचा आलेख दिवसेंदिवस उंचावतच गेला.

  • 6/15

    अजयचे वडील वीरु देवगण खुद्द चित्रपटातील स्टंट दृश्यांचे मार्गदर्शक असल्यामुळे अजयची चित्रपटात निर्माण झालेली अ‍ॅक्शन हिरोची झलक त्याला उपजत मिळाली हे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

  • 7/15

    अजय फक्त या एकाच चाकोरीत अडकून राहिला नाही. १९९४ मध्ये रविना टंडन सोबतच्या ‘दिलवाले’ चित्रपटातील भूमिकेने त्याने चाहत्यांना हेलावून सोडले. तर महेश भट्ट यांची कलाकृती असलेल्या ‘जख्म’ चित्रपटातील भूमिकेबद्दल राष्ट्रीय पुरस्कार पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

  • 8/15

    १९९९ नंतर अ‍ॅक्शन हिरोच्या चित्रपटामध्ये प्रेमाचे रंग दिसू लागले. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘हम दिल दे चुके सनम’. सलमान खान, अजय देवगण आणि ऐश्वर्या राय यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपटात अजयचा एक वेगळा रंग पाहायला मिळाला.

  • 9/15

    ‘गंगाजल’, ‘सिंघम’ या चित्रपटातून बेधडक अधिकारी साकारत त्याने तरुणाईच्या मनात एक वेगळी छाप सोडली.

  • 10/15

    ‘इश्क’ चित्रपटातून आमिरसोबत विनोदी ढंग सादर करणाऱ्या अजयने रोहित शेट्टीसोबत ‘गोलमाल’ चित्रपटाच्या मालिकेत कमाल धम्माल केल्याचे पाहायला मिळाले.

  • 11/15

    ‘बोलबच्चन’ या चित्रपटातूनही तो विनोदी अंगाने प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसला.

  • 12/15

    बॉलिवूडमध्ये जोडया बनतात आणि तुटतात. पण फार कमी अशी प्रेम प्रकरणे असतात, जी विवाहापर्यंत पोहोचतात. अजय देवगण आणि काजोल यांच नातं सुद्धा असचं आहे. अजय आणि काजोलच्या लग्नाला आता २१ वर्ष झाली. १९९९ साली दोघे विवाहबद्ध झाले. इतक्यावर्षात कधीही त्यांच्यात बेबनाव झाल्याचं समोर आलं नाही. बॉलिवूडमध्ये अजय-काजोलकडे आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं.

  • 13/15

    अजय आणि काजोलने चार वर्ष एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अजयच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नासाठी होकार दिला होता. मात्र काजोलने घरी सांगताच तिच्या वडिलांनी तिच्यासोबत चार दिवस बोलणे बंद केले होते. कजोलने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करावे असे तिच्या वडिलांना वाटत होते. पण नंतर काही दिवसांनी काजोलच्या घरातील देखील लग्नासाठी तयार झाले. त्यांनी १९९९मध्ये लग्न केले. अतिशय खासगी पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पाडला. अजय आणि काजोलच्या लग्नाला काही मोजक्याच लोकांनी हजेरी लावली होती.

  • 14/15

    त्याच्या काही दिवासांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. तसेच हा चित्रपट अजयच्या करिअरमधील १००वा चित्रपट होता.

  • 15/15

    नव्वदच्या दशकात करिअर सुरू करणारा अजय प्रत्येक चित्रपटासाठी तगडं मानधन घेतो. शाही लाइफस्टाइलचा तो शौकीन आहे. सर्वांत महागड्या गाड्यांचं कलेक्शन त्याच्याकडे आहे.

Web Title: Birthday special bollywood actor ajay devgn unknown information and stunning photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.