-
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री सायली संजीव.
-
काही दिवसांपूर्वी सायलीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता.
-
या फोटोमध्ये तिने एक वनपीस परिधान केला असून ती अतिशय सुंदर दिसत होती.
-
तिच्या या फोटोवर चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने कमेंट करत लक्ष वेधून घेतले होते.
-
ऋतुराजने "Woahh" अशी कमेंट केली होती.
-
त्यानंतर ऋतुराजचे नाव सायलीशी जोडले जात होते.
-
आता ऋतुराजने एक पोस्ट शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
-
त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर केली आहे.
-
त्याने या पोस्टमध्ये स्वत:चा फोटो शेअर केला आहे.
-
'माझी विकेट फक्त गोलंदाजच घेऊ शकतो आणि क्लिन बोल्ड सुद्धा. कुणाचं काय तर कुणाचं काय' असे त्याने म्हटले आहे.
-
या फोटोच्या खाली त्याने, 'ज्यांना समजायचंय त्यांना समजलं. कोणीतरी खरं म्हटलय मिठ, मसाला आणि मिरची टाकली की चव येते' असे म्हटले आहे.
‘माझी विकेट फक्त…’, सायलीच्या फोटोवर कमेंट केल्यानंतर CSKच्या ऋतुराजची पोस्ट चर्चेत
काही दिवसांपूर्वी ऋतुराजने अभिनेत्री सायली संजीवच्या फोटोवर कमेंट केली होती.
Web Title: Csk opener ruturaj gaikwad slams back on affair with actress sayali sanjeev avb