• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. these bollywood actresses who changed their religion for love dcp

या बॉलिवूड अभिनेत्रींनी प्रेमासाठी केलं धर्म परिवर्तन?

May 18, 2021 17:55 IST
Follow Us
  • प्रेमात जात-पात धर्म काही पाहिलं जातं नाही असे डायलॉग आपण चित्रपटामध्ये नेहमीच ऐकतो. मात्र, चित्रपटातील ते डायलॉग काही कलाकारांनी खऱ्या आयुष्यात अवलंबले आहेत. आज अशाच अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया ज्यांनी धर्माबाहेर जाणून लग्न केले आणि एवढंच नाही तर प्रेमासाठी त्यांनी त्यांचा धर्म देखील बदलला.
    1/10

    प्रेमात जात-पात धर्म काही पाहिलं जातं नाही असे डायलॉग आपण चित्रपटामध्ये नेहमीच ऐकतो. मात्र, चित्रपटातील ते डायलॉग काही कलाकारांनी खऱ्या आयुष्यात अवलंबले आहेत. आज अशाच अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया ज्यांनी धर्माबाहेर जाणून लग्न केले आणि एवढंच नाही तर प्रेमासाठी त्यांनी त्यांचा धर्म देखील बदलला.

  • 2/10

    शर्मिला टागोर – बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर या त्यांच्या वेळेच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होत्या. शर्मिला या भारतीय क्रिकेट टीमचे माजी खेळाडू आणि कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांच्या प्रेमात होत्या.

  • 3/10

    मन्सूर हे 'टायगर पतौडी' या टोपण नावाने देखील ओळखले जायचे. मन्सूर यांच्याशी लग्न करण्यासाठी शर्मिला यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. लग्नानंतर शर्मिला यांनी त्यांचे नाव बेगम आयशा सुल्तान ठेवले होते.

  • 4/10

    नरगिस – नरगिस या एकेकाळी बॉलिवूडच्या सर्वात यशस्वी अभिनेत्री होत्या. वयाने लहान अभिनेता सुनील दत्तवर नरगिस यांचे प्रेम होते. नरगिस यांनी सुनील दत्तशी लग्न केले, त्यावेळी त्यांनी इस्लाम धर्म सोडला आणि त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. एवढंच नाही तर त्यांनी लग्नानंतर नाव बदलून निर्मला दत्त केले होते.

  • 5/10

    अमृता सिंग – बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंग देखील वयाने लहान सैफ अली खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. सैफशी लग्न करण्यासाठी अमृताने इस्लाम धर्म स्वीकारला होता. सैफचे कुटुंब या लग्नाच्या विरोधात होते. १३ वर्षानंतरच ते विभक्त झाले. त्यानंतर सैफने करीना कपूरशी लग्न केले.

  • 6/10

    आयशा टाकिया – आयशा टाकियाचे वडील हिंदू होते तर आई मुस्लीम. आयशा टाकियाने मुंबईतील रेस्टॉरंट मालक आणि समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीशी केले होते. त्यांनी पारंपारिक मुस्लिम पद्धतीत लग्न केले. इस्लाम धर्म स्वीकारल्याचे आयशाने कबुली दिली नसली तरी तिचे लग्न पाहता तिने इस्लाम धर्म स्वीकारल्याच्या चर्चा सुरु होत्या.

  • 7/10

    हेजल किच – अभिनेत्री हेजल किचने २०१६ मध्ये भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगशी लग्न केले. युवराजशी लग्न करण्यासाठी हेजलने शीख धर्म स्वीकारला. हेजलने तिचे नाव बदलून गुरबासंत कौर असे केले आहे.

  • 8/10

    नगमा – अभिनेत्री नगमा यांचे वडील हिंदू होते. तर आई मुस्लिम होती. नगमा पूर्वी कोणत्या धर्मावर विश्वास ठेवत होत्या याबद्दल सगळ्यांना ठावूक नाही. परंतु २००८ मध्ये त्यांनी सांगितले की त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. नगमा यांचा जन्म देखील २५ डिसेंबर रोजी झाला होता. लहानपणापासून मिशनरी शाळेत शिक्षण घेतल्यामुळे त्यांचा कल त्या धर्माकडे होता.

  • 9/10

    दिव्या भारती – अभिनेत्री दिव्या भारती यांना लहान वयातच प्रसिद्धी मिळाली होती. दिव्या भारतीने गपचूप निर्माता साजिद नाडियाडवालाशी लग्न केले, असे म्हटले जाते. यासाठी दिव्या भारती यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. मात्र, निधनानंतर थोड्या दिवसात दिव्या यांचे निधन झाले.

  • 10/10

    ममता कुलकर्णी – ममता कुलकर्णी यांनी बॉयफ्रेंड विक्की गोस्वामीशी लग्न केले. विकीला यूएईमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीसाठी २५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. नंतर विकीने इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्याची शिक्षा माफ झाली. विकीसोबत ममता कुलकर्णी यांनीही इस्लाम धर्म स्वीकारल्याचे म्हटले जाते.

Web Title: These bollywood actresses who changed their religion for love dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.