• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. diya aur baati hum s deepika singh goyal faces the wrath of netizens gets slammed for dancing amid uprooted trees what a shame dcp

अभिनेत्रीचा चक्रीवादळामुळे पडलेल्या झाडाजवळ डान्स; नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाले…

May 19, 2021 18:09 IST
Follow Us
  • संपूर्ण देश करोना व्हायरसशी सामना करत असताना तौते चक्रीवादळाने राज्याला फटका दिला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा यामुळे अनेक झाडे पडली तर मोठ्या प्रमाणात आणखी नुकसान झालं. कित्येक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर सगळ्यांना घरात राहण्याचा सल्ला दिला होता.
    1/8

    संपूर्ण देश करोना व्हायरसशी सामना करत असताना तौते चक्रीवादळाने राज्याला फटका दिला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा यामुळे अनेक झाडे पडली तर मोठ्या प्रमाणात आणखी नुकसान झालं. कित्येक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर सगळ्यांना घरात राहण्याचा सल्ला दिला होता.

  • 2/8

    'दीया और बाती' या मालिकेती संध्या म्हणजेच अभिनेत्री दीपिका सिंग गोयलने या मुसळधार पावसात पडलेल्या झाडामध्ये नाचत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

  • 3/8

    हा व्हिडीओ दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. दीपिकाने कलरफूल कपडे परिधान केले आहेत. “तुम्ही वादळाला शांत नाही करू शकतं त्यामुळे प्रयत्न करणं थांबवा. तुम्ही स्वत:ला शांत ठेवा. निसर्गाशी प्रेम करा आणि त्याच्या मूड सहन करायला शिका. एक दिवस हे वादळ नक्की जाईल,”अशा आशयाचे कॅप्शन हे दीपिकाने त्या फोटोला दिले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

  • 4/8

    हा व्हिडीओ शेअर केल्या नंतर दीपिकाला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, "अशा प्रकारच्या व्हिडीओचा प्रचार करु नका..अशा वेळेस बाहेर नसले पाहिजे."

  • 5/8

    दुसरा नेटकरी म्हणाला, "लोक चक्रीवादळात मरत आहेत .. आपल्यासारखे लोक याचा आनंद घेत आहेत .. काही लाज आहे.."

  • 6/8

    तिसरा नेटकरी म्हणाला, "तुझ्या घराचं छत व्यवस्थित आहे म्हणून..", अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी दीपिकाला ट्रोल केले आहे.

  • 7/8

    या आधी एक फोटो पोस्ट करत दीपिकाने या पडलेल्या झाडाबद्दल सांगितले. "आपण वादळ शांत करू शकत नाही, म्हणून प्रयत्न करणे थांबवा. आपण काय करू शकतो तर ते स्वत: ला शांत करु शकतो, निसर्गावर प्रेम करा आणि एक दिवस हे वादळ नक्की जाईल..पोस्टस्क्रिप्ट: हे झाड माझ्या घराबाहेर पडलं आणि कोणालाही इजा झालेली नाही, परंतु ते माझ्या घरापासून दूर करण्याआधी, रोहित आणि मी काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी काही फोटो काढले," अशा आशयाचे कॅप्शन दिले होते.

  • 8/8

    दीपिकाने 'दीया और बाती' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. नंतर तिला 'द रियल सोलमेट' या वेब सीरिजमध्ये पाहिले गेले. तर, 'कवच महाशिवरात्री' आणि 'घुम है किसेकी प्यार में' या मालिकांमध्ये काम केले होते. (All Photo Credit : Deepika Singh Instagram)

Web Title: Diya aur baati hum s deepika singh goyal faces the wrath of netizens gets slammed for dancing amid uprooted trees what a shame dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.