-
अमृता खानविलकर हे नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर येते ती निखळ हास्य असलेली अभिनेत्री. (फोटो सौजन्य: अमृता खानविलकर, इन्स्ताग्राम)
-
ब्यूटी विथ द ब्रेन अशी मोजक्या शब्दात ओळख करुन देता येईल अशा अमृता ही मराठीमधील काही मोजक्या बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
अमृता सोशल मीडियावर सक्रिय असून कायम तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
-
नुकतेच अमृताने स्वत:चे पंजाबी स्लीव्हलेस कुर्त्यामधील काही फोटो इन्स्ताग्रामवर शेअर केले.
-
या फोटोंमध्ये अमृता ट्रॅडिश्नल पेहरावमध्येही फारच बोल्ड दिसत आहे.
-
अमृताने काळ्या रंगाचा स्लीव्हलेस कुर्ता परिधान केल्याचं फोटोंमध्ये दिसत असून ही फार सुंदर दिसत आहे.
-
अमृताचे हास्य आणि मोहक अदांवर तिचे चाहते फिदा झाल्याचं कमेंट सेक्शनमध्ये दिसून येत आहे.
-
या कमेंटपैकी एका मजेदार कमेंटला अमृतानेच उत्तर दिलं आहे.
-
झालं असं की, दिपक गोळे पाटील नावाच्या एका चाहत्याने अमृताच्या फोटोंवर कमेंट करताना, "हे असले घातक फोटोशूट करताना वाघाचं काळीज पाहिजे फोटोग्राफरचे," असं म्हटलं.
-
सामान्यपणे कमेंट केल्यानंतर लाखो फॉलोअर्स असणारे सेलिब्रिटी आपल्या कमेंटला उत्तर देतील अशी अपेक्षा चाहत्यांना नसते. मात्र या मजेदार कमेंटवर अमृताने आवर्जून कमेंट केलीय. या कमेंटमध्ये अमृताने, "आईने काढलेत फोटोज," असं उत्तर दिलं आहे.
-
एखाद्या प्रोफेश्नल फोटोग्राफरने फोटो काढल्याप्रमाणे हे फोटो सुंदर असल्याचं सांगताना चाहत्याने केलेल्या या कमेंटला अमृताने रिप्लाय दिल्यावर अनेकांनी तिचा रिप्लाय लाइक केला आहे. या कमेंटचाच संदर्भ घेत एकाने, "मग आई वाघीण आहे," असंही म्हटलंय.
“असल्या घातक फोटोशूटसाठी वाघाचं काळीज पाहिजे फोटोग्राफरचे”; चाहत्याच्या या कमेंटवर अमृताचं भन्नाट उत्तर, म्हणाली…
अमृताचे हास्य आणि मोहक अदांवर तिचे चाहते फिदा झाल्याचं कमेंट सेक्शनमध्ये दिसून येत आहे. मात्र यापैकी एका कमेंटला अमृताने रिप्लाय केलाय
Web Title: Amruta khanvilkar instagram photos she gave reply to her fans comment scsg