-

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे.
-
राधिकाने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
‘बदलापूर’, ‘पॅडमॅन’, ‘अंधाधून’ या चित्रपटांच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
तसेच चित्रपटांमध्ये दिलेल्या न्यूड सीनमुळे राधिका नेहमीच चर्चेचा विषय ठरते.
-
नुकताच राधिकाने नेहा धूपियाच्या ‘बीएफएफ विथ व्होग्स’ या कार्यक्रमात हजेरी लावली.
-
त्यावेळी राधिकासोबत अभिनेता राजकुमार राव देखील उपस्थित होता.
-
कार्यक्रमात नेहा, राधिका आणि राजकुमार मजा मस्ती करताना दिसत होते.
-
दरम्यान नेहाने राधिकाला ‘तुझी आवडती बेड पोझिशन कोणती?’ असा प्रश्न विचारला.
-
त्यावर राधिकाने मजेशीर अंदाजात दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
‘नक्कीच, जेव्हा मी एकटी बेडवर झोपते. तू कोणत्या व्यक्तीचा उल्लेख केला नाहीस’ असे मजेशीर अंदाजात उत्तर देत राधिका म्हणाली.
-
त्यानंतर नेहाने राधिकाला आतापर्यंत केलेले सर्वात विचित्र काम कोणते असा प्रश्न देखील विचारला.
-
त्यावर राधिकाने ‘दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करणे’ असे उत्तर दिले आहे.
-
नेहाच्या या कार्यक्रमात राधिकाने ‘देव डी’ चित्रपटाच्या ऑडिशनचा देखील किस्सा सांगितला आहे.
-
या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी तिला फोनवर अश्लील गोष्टी कराव्या लागल्या होत्या.
-
योग्य पद्धतीने ऑडिशन देऊनही राधिकाची चित्रपटासाठी निवड करण्यात आली नाही.
-
‘देव डी चित्रपटाच्या ऑडिशनसाठी मला फोनवर अश्लील गोष्टी करण्यास सांगण्यात आले. मी ते केलं देखील. कारण मला त्या चित्रपटासाठी सिलेक्ट व्हायचे होते. मी उत्तम अभिनय केला. पण तरीही माझी निवड करण्यात आली नाही’ असे राधिका म्हणाली.
-
(All Photos: Radhika Instagram)
‘आवडती बेड पोझिशन कोणती?’, राधिका आपटे म्हणाली…
Web Title: Neha dhupia asked radhika apte favorite position on bed avb