-

अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण या दोघांची जोडी म्हणजे सुपरहीट चित्रपट हे जणू ठरलेलं सूत्र आहे.
-
खऱ्या आयुष्यातील पती-पत्नी पडद्यावरही जोडादाराची भूमिका बजावतात तेव्हा त्यांच्यातील ऑन स्क्रीन कमेस्ट्री पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात. तसंच या दोघांबद्दल घडतं.
-
‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र झळकले आहेत.
-
हे तिन्ही चित्रपट या दोघांच्या करियरमधील महत्वाचे चित्रपट ठरले आहेत.
-
रणवीर आणि दीपिका लवकरच पुन्हा एकदा कबीर खान दिग्दर्शित ‘८३’ या चित्रपटामध्ये हे दोघे पुन्हा एकत्र दिसणार आहेत.
-
विशेष म्हणजे ऑफस्क्रीन पती-पत्नी असलेली ही जोडी ऑनस्क्रीनवर देखील पती-पत्नीच्या रुपात झळकणार आहेत.
-
या चित्रपटामध्ये रणवीर सिंह १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे.
-
तर दीपिका कपिल देव यांच्या पत्नीची म्हणजेच रोमी भाटिया यांची भूमिका साकारणार आहे.
-
बॉलिवूडमधील चर्चेनुसार रणवीर आणि दीपिका यांची भेटच चित्रपटांमुळे झाली आणि चित्रपटांमध्ये काम करतानाच या दोघांमधील नात्याला सुरुवात झाली.
अनेक वर्ष एकमेंना डेट केल्यानंतर २०१८ साली या दोघांनी वर्षी दोघांनी लग्न केले. -
अगदी शाही थाटात या दोघांचं लग्न पार पडलं.
-
मात्र लग्नानंतर हे कोणत्याही चित्रपटामध्ये एकत्र झळकलेले नाहीत.
-
अशाच आता ते '८३' व्यतिरिक्त एका चित्रपटात एकत्र झळकणार होते. मात्र त्या चित्रपटातून दीपिकाची गच्छंती करण्यात आलीय.
-
बॉलीवूडमध्ये अभिनेत्री आणि अभिनेत्यांना समान मानधन दिलं पाहिजे अशी मागणी मागील काही काळापासून जोर धरु लागली आहे. मात्र यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. असं असतानाच आता याच विषयासंदर्भात अभिनेता रणवीर सिंग आणि त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका पदूकोणबद्दलची एक बातमी समोर आलीय.
-
सामान्यपणे अभिनेत्री जेव्हा त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्याइतकं मानधन मागतात तेव्हा त्यांची खिल्ली उडवली जाते. त्यांना चित्रपटातून हटवलं जातं किंवा मग त्यांच्या जागी इतर कोणाला तरी संधी दिली जाते. दीपिकासोबतही असच काहीसं झालं आहे. काय घडलंय नक्की जाणून घेऊयात.
-
मानधनाच्या कारणावरुन दीपिकाला डच्चू देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
-
दीपिकाने या चित्रपटामध्ये तिच्यासोबत काम करणाऱ्या रणवीर इतक्याच मानधनाची मागणी केल्याने तिला चित्रपटातून काढण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
-
दीपिकाला तिच्या पती इतकं मानधन या चित्रपटासाठी हवं होतं. तसं तिने निर्मात्यांना कळवलं होतं. तसा तिचा जणू हट्टच होता इतकी ती यासंदर्भात गंभीर होती.
-
आपण रणवीरला देण्यात येणाऱ्या मानधनापेक्षा एक पैसाही कमी जास्त घेणार नाही, अशी भूमिका दीपिकाने मांडल्याचं या प्रकरणाशीसंबंधित सुत्रांनी सांगितलं.
-
अभिनेते आणि अभिनेत्रींना समान मानधन मिळावे अशी दीपिकाची कायमच भूमिका असते.
-
त्यामुळेच तिच्या मागच्या काही चित्रपटांसाठी तिला जवळजवळ तिच्यासोबतच्या अभिनेत्यांइतकेच मानधन देण्यात आले.
-
मात्र यावेळेस भन्साळींनी दीपिकाची समान मानधनाची मागणी नाकारल्याचं सुत्रांनी म्हटलं आहे.
-
विशेष म्हणजे दीपिकानेच अधिक मानधनाची मागणी केल्याने हा व्यवहार फिस्कटल्याचा एकप्रकारे आपल्याला फायदा झाल्याचं भन्साळी यांचं मत असल्याची माहिती समोर आलीय.
-
दीपिका आणि रणवीरसोबत भन्साळी यांनी याआधी तीन चित्रपट केले असून पुन्हा एक चित्रपट या दोघांना घेऊन करणं हे अती झालं असतं, असं भन्साळींचं मत असल्याचं समजतं.
-
त्यामुळेच आता दीपिका आणि रणवीर यांना केवळ ८३ चित्रपटामध्ये एकत्र पाहण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे. (फोटो : पीटीआय, सोशल नेटवर्किंग आणि इन्स्टाग्रामवरुन सभार)
‘तो’ एक हट्ट दीपिकाला महागात पडला… नवऱ्यासोबतच्या महत्वाच्या चित्रपटातून मिळाला डच्चू
या दोघांनी आतापर्यंत एकूण तीन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं असून त्यांचा नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
Web Title: Deepika padukone is reportedly out of baiju bawra for demanding equal pay as ranveer singh scsg