Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shershaah vikram batra refused the pakistani soldiers request for giving them madhuri dixit over kargil war end dcp

‘माधुरी दीक्षित दे, आम्ही लगेच इथून निघून जाऊ’, पाकिस्तानच्या मागणीला कॅप्टन विक्रम बत्रांनी दिले होते ‘असे’ उत्तर

August 12, 2021 16:31 IST
Follow Us
  • shershaah, captian vikram batra, madhuri dixit, siddharth malhotra,
    1/20

    बॉलिवूडमध्ये प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभक्तीवर आधारीत एकतरी चित्रपट प्रदर्शित होतो. बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत चित्रपट 'शेरशाह' आज १२ ऑगस्टरोजी प्रदर्शित झाला आहे.

  • 2/20

    या चित्रपटात कारगिल युद्धात शहिद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांची कहाणी दाखवण्यात आली आहे.

  • 3/20

    आता या चित्रपटामुळे विक्रम बत्रा यांच्या युद्धातील एक किस्सा सध्या चर्चेत आला आहे.

  • 4/20

    चित्रपटातील या सीनमध्ये कॅप्टन विक्रम बत्रा हे त्यांच्या टीमसोबत पॉइंट ४८७५ साठी लढत होते. या सीनमध्ये एका पाकिस्तानीने युद्ध सुरु असताना विक्रम बत्रा यांच्याकडे एक विचित्र मागणी केली.

  • २०१७ मध्ये कॅप्टन विक्रम यांचा भाऊ विशालने एका मुलाखतीत हा किस्सा सांगितले आहे. त्यांनी सांगितले की पाकिस्तानी लष्कर विक्रम यांच्या या मिशनमध्ये सारखे अडथळे निर्माण करत होते आणि त्यांना धमकावत होते.
  • 5/20

    पाकिस्तानी सैनिक विक्रम यांच्याशी रेडिओवर संपर्क साधत त्यांना आव्हान देत होता. तो पाकिस्तानी म्हणाला, 'अरे शेरशाह, इथे येऊ नकोस, नाही तर तुझे नुकसान होईल. त्यावेळी विक्रम यांना खूप राग आला की एक पाकिस्तानी त्यांना कसे आव्हान देऊ शकतो? तेव्हा विक्रम म्हणाले, तिथेच रहा, आम्ही एका तासात तिथे पोहोचत आहोत.'

  • 6/20

    यावर लगेच पाकिस्तानी म्हणाला, 'तुला माहित आहे का, आम्ही तुला मारण्यासाठी येत आहोत आणि तुझ्या आवडत्या अभिनेत्रीला घेऊन जाऊ.'

  • तो पाकिस्तानी पुढे म्हणाला, 'अरे आम्हाला माधुरी दीक्षित दे, अल्लाहची शपथ घेतो, आम्ही सगळे लगेच इथून निघून जाऊ. पाकिस्तानीच्या या मागणीवर कॅप्टन विक्रम बत्रा त्याला सडेतोड उत्तर देत म्हणतात, माधुरी दीक्षित तर दुसऱ्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत, सध्या याच्यावरच काम चालव.'
  • विक्रम चालत राहिले आणि त्यांनी शत्रूंचे सगळे बंकर उडवून लावले आणि म्हणाले 'माधुरी दीक्षितकडून तुमच्यासाठी ही भेट आहे.'
  • यानंतर कॅप्टन विक्रम बत्रा यांनी पाकिस्तानीवर हल्ला केला. असे म्हटले जाते की ज्या पाकिस्तानीने विक्रम बत्रा यांच्याकडे माधुरी दीक्षितला त्यांच्याकडे सोपवण्याची मागणी केली होती. त्याला त्यांनी गोळ्या घातल्या आणि त्याआधी ते त्या पाकिस्तानीला म्हणाली, 'घे बाळा माधुरी दीक्षितची ही भेट तुझ्यासाठी आहे.'
  • 7/20

    शेरशाह हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

  • 8/20

    या चित्रपटात विक्रम बत्रा याचा लहाणपणापासून ते कारगिल युद्धा पर्यंत संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला आहे.

  • कॅप्टन विक्रम बत्रा शेवटच्या क्षणापर्यंत शत्रुंना कसे लढा देत होते आणि त्यांनी त्यांच्या शत्रुंना कसे पराभव केले, हे या चित्रपटात पाहता येणार आहे.
  • सुत्रांनुसार, कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या कुटुंबाला त्यांच्या मुलाच्या आयुष्यावर असणाऱ्या या चित्रपटात मुख्य भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्राच पाहिजे होता. कारण दोघांचे चेहऱ्यामध्ये साम्य आहे.
  • या चित्रपटामध्ये विक्रम बत्रा यांच्या गर्लफ्रेंडची भूमिका अभिनेत्री कियारा आडवाणी साकारत आहे.
  • कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या प्रेयसीचे नाव डिंपल छीमा नाव आहे.
  • 9/20

    या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णु वर्धन यांनी केले आहे.

  • 10/20

    विक्रम बत्रा यांचा 'ये दिल मांगे मोर' हा डायलॉग सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

  • या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीसोबत शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशू अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अंकिता गोराया, अनिल चरणजीत, साहिल वैद, शताफ फिगर आणि पवन चोप्रा देखील म्हातावची भूमिका सकरतान दिसतील.
  • 'शेरशाह'हे नाव सार्थ करत कॅप्टन बत्रा यांनी दिलेला साहसी लढा आणि सरतेशेवटी केलेले बलिदान भारताच्या विजयामध्ये महत्त्वाचे ठरले होते.

Web Title: Shershaah vikram batra refused the pakistani soldiers request for giving them madhuri dixit over kargil war end dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.