-
बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता गेल्या काही दिवसांपासून चित्रपटापेक्षा त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तक ‘सच कहूं तो’मुळे चर्चेत आहेत. (आणखी वाचा : नीना गुप्तांनी शेअर केला शंकर नाग यांच्यासोबतचा बोल्ड फोटो; सोशल मीडियावर चर्चा)
-
या पुस्तकात त्यांनी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे.
-
या पुस्तकात त्यांनी त्यांचे खासगी आयुष्य, कुटुंब, अफेअर, ब्रेकअप अशा अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
-
नीना यांनी पुस्तकात कुटुंबातील काही समस्यांचा देखील उल्लेख केला आहे.
-
वडिलांविषयी सांगताना नीना म्हणाल्या की त्यांच्या वडिलांचे दोन कुटुंब होते.
-
नीना यांचे वडील हे दुसऱ्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवत असत. त्यामुळे आई नेहमी दु:खी असायची असे नीना यांनी सांगितले.
-
‘माझ्या वडिलांनी माझ्या आईसोबत जे कृत्य केले ते लपवण्यासाठी आईने स्वत:ला संपवले. म्हणून मला असे वाटते की मी हे पुस्तक माझे वडील, आई, भाऊ आणि वहिनी यांच्या निधनानंतर लिहिले. ते जीवंत असताना मी हे पुस्तक लिहू शकले नसते’ असे नीना म्हणाल्या.
-
नीना गुप्ता यांनी त्यांच्या या पुस्तकात कास्टिंग काउचचा देखील अनुभव सांगितला आहे.
-
एका निर्मात्याने त्यांना हॉटेल रूममध्ये बोलावले होते आणि एक रात्र त्याच्यासोबत घालवण्यास सांगितली होती असा खुलासा त्यांनी केला होता.
-
हा निर्माता बॉलिवूडमधील नसून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील होता.
-
त्यावेळी नीना मुंबईच्या जुहू येथील पृथ्वी थिएटरमध्ये परफॉर्म करत होत्या.
-
यानंतर नीना निर्मात्यास भेटण्यासाठी हॉटेलमध्ये पोहोचल्या.
-
पण जेव्हा निर्मात्याने नीना यांना लॉबीत भेटण्याऐवजी त्याच्या रूममध्ये बोलावले तेव्हा त्यांना विचित्र वाटले होते.
-
नीना गुप्ता यांचा ‘सरदार का ग्रँडसन’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात नीना गुप्ता यांच्यासोबत अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत दिसले
-
नीना या अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गूडबाय’ या चित्रपटात दिसणार आहेत. अमिताभ आणि नीना यांच्या व्यतिरिक्त रश्मिका मंदाना आणि पावेल गुलाटी दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे विकास बहल करणार आहेत.
‘वडिलांचे कृत्य लपवण्यासाठी आईने स्वत:ला संपवले’, नीना गुप्ता यांचा खुलासा
नीना गुप्ता यांनी त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तक ‘सच कहूं तो’मध्ये खुलासा केला आहे.
Web Title: Neena gupta says my mother killed herself trying to hide what my father did to her avb