-
आपल्या प्रभावी अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने ओटीटी प्लॅटफॉर्म सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे तो यापुढे नेटफ्लिक्स, अमॅझॉन प्राईनसारख्या कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करताना दिसणार नाही. हा नवाजुद्दीनच्या चाहत्यांना मोठा धक्का आहे. यापूर्वी नवाजने सेक्रेड गेम, सीरियस मॅन सारख्या हिट वेबसीरिजमध्ये आपली वेगळी छाप सोडली होती. त्यानं नेमकं का हा मोठा निर्णय घेतला याच ९ कारणांचा हा आढावा.
-
सध्या स्वतःला स्टार समजणाऱ्या अभिनेत्यांसाठी आणि मोठमोठ्या निर्मात्यांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म धंदा बनलंय : नवाजुद्दीन सिद्दीकी
-
अनेक अनावश्यक शोसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म ‘डंपिंग ग्राऊंड’ बनलंय : नवाजुद्दीन सिद्दीकी
-
सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर असे शो आहेत जे एकतर पाहण्याच्या लायकीचे नाहीत किंवा कशाचे तरी सिक्वल आहेत ज्यामध्ये नवं काहीच सांगण्यासारखं नाही : नवाजुद्दीन सिद्दीकी
-
मी जेव्हा सेक्रेड गेमसाठी नेटफ्लिक्ससोबत काम करायला सुरुवात केली तेव्हा खूप डिजीटल मीडियाविषयी खूप उत्सूकता आणि आव्हानं होती. नव्या लोकांना संधी दिली जात होती. मात्र, आता त्याचा ताजेपणा निघून गेला आहे : नवाजुद्दीन सिद्दीकी
-
बॉलीवूडमधील प्रमुख चित्रपट निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्व मोठ्या लोकांशी फायद्याचे करार केलेत. निर्मात्यांना अमर्यादीत कंटेंट तयार करण्यासाठी प्रचंड मोठी रक्कम मिळते. मात्र, अमर्यादीत कंटेंटने गुणवत्तेला मारलं आहे : नवाजुद्दीन सिद्दीकी
-
मला ओटीटी प्लॅटफॉर्मवरील जे शो पाहणंही शक्य होत नसेल, त्यात मी कसं काम करू? : नवाजुद्दीन सिद्दीकी
-
या स्टार व्यवस्थेने मोठ्या पडद्याला खाऊन टाकलं. आता आमच्यासारखे तथाकथित OTT स्टार मोठ्या पैशाची मागणी करतात आणि बॉलीवूड ए-लिस्टर्ससारखे ताशेरे ओढतात : नवाजुद्दीन सिद्दीकी
-
कंटेंट हाच निर्णायक आहे हे ते विसरले आहेत. स्टारचं राज्य असायचं तो काळ निघून गेलाय : नवाजुद्दीन सिद्दीकी
-
लॉकडाऊनच्या आणि डिजीटल मीडियाच्या प्रभावाआधी बॉलिवूडमधील ए लिस्टर त्यांचा चित्रपट देशभरातील ३,००० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करायचे. प्रेक्षकांना हे चित्रपट पाहण्याखेरीज कोणताच पर्याय उरायचा नाही. आता प्रेक्षकांना अनेक पर्याया खुले आहेत : नवाजुद्दीन सिद्दीकी
Photos : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा ओटीटी प्लॅटफॉर्म सोडण्याचा मोठा निर्णय, ‘ही’ आहेत ९ कारणं
आपल्या प्रभावी अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने ओटीटी प्लॅटफॉर्म सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यानं नेमकं हा मोठा निर्णय का घेतला याच ९ कारणांचा हा आढावा.
Web Title: Know what are the reasons behind quitting ott platform by actor nawazuddin siddiqui pbs