• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. vikram gokhales opinion about shiv sena bjp alliance kangana ranaut and prime minister modi msr

PHOTOS : शिवसेना-भाजपा युती, कंगना रणौत आणि पंतप्रधान मोदींबद्दल विक्रम गोखलेंनी मांडली भूमिका, म्हणाले…

ब्राह्मण महासंघाच्यावतीने ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना विविध मुद्द्य्यांवर प्रतिक्रिया दिली.

Updated: November 14, 2021 19:15 IST
Follow Us
  • कंगना रणौत हिने स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वक्तव्याला समर्थन देत विक्रम गोखले म्हणतात,
    1/1

    कंगना रणौत हिने स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वक्तव्याला समर्थन देत विक्रम गोखले म्हणतात, “हे स्वातंत्र्य दिलं गेलं आहे. स्वातंत्र्य मिळावं यासाठी लढणारे योद्धे फासावर जात असताना अनेक मोठे लोक पाहत राहिले. ब्रिटीशांविरोधात उभे राहत असतानाही आपल्या लोकांना वाचवलं नाही.” ( सर्व छायाचित्रे – संग्रहीत व प्रातिनिधिक)

  • 2/1

    “स्वातंत्र्य भीक मागून मिळाल्याच्या कंगनाच्या वक्तव्याशी मी सहमत आहे.” असं म्हणत त्यांनी कंगणा रणौतच्या वक्तव्याला पाठिंबा दिला.

  • 3/1

    “भारत कधीही हिरवा होणार नाही याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हा देश भगवाच राहिला पाहिजे.” असं विधानही त्यांनी जाहीरपणे केले.

  • 4/1

    “मतपेटीचं राजकारण सुरू झाल्यापासून वादला काही कमी नाही. कुठल्याही अगदी फडतूस कारणावरून वाद निर्माण होतात. यामध्ये सगळे आले, एकही पक्ष असा नाही की जो वादात पडत नाही.” असंही ते म्हणाले आहेत.

  • 5/1

    तर पंतप्रधान मोदींचं कौतुक करताना विक्रम गोखले म्हणाले, “एक व्यक्ती देशात ७० वर्षांपासून जी घाण साचली आहे ती साफ करत आहे, त्याला काही काळ का होईना मदत करता येत नाही?”

  • 6/1

    भाजपा-शिवसेनेला उद्देशून “लोकांना फसवून नका. लोक केव्हा तरी मग प्रचंड शिक्षा करतात आणि ती आता आपण भोगत आहोत.” असा त्यांनी सल्ला दिला.

  • 7/1

    “मी तोंड दाभणाने बांधून घेत नाही आणि म्हणून मी कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही. कारण, मी फाडफाड बोलणार माणूस आहे. मी वरचे आदेश वैगरे सगळं झुगारून देतो.” असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

  • 8/1

    तर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्शवभूमीवर प्रतिक्रिया देताना, “एसटीला गाळात घालण्याचं काम, एअर इंडियाला गाळात घालण्याचं काम हे राजकीय लोकांनी केलेलं आहे.” असा आरोप त्यांनी केला आहे.

  • 9/1

    राज्यातील आजच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बोलताना “बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील? याची कल्पना फक्त जे आता बाहेर राहून केवळ बघत आहेत, त्यांनाच येऊ शकते. त्यातला मी एक आहे.” असं विक्रम गोखले यांनी बोलून दाखवलं.

  • 10/1

    तर, “पक्षाचं काम सगळेच करतात. पण मोदी जेव्हा देशासाठी उभं राहतात तेव्हा ते माझे आदर्श नायक असतात.” असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींची स्तुती देखील केली.

  • 11/1

    “ज्या संकटाच्या कड्यावरती आता आपला देश उभा आहे, त्यातून त्याला मागे खेचायचं असेल तर भाजपा आणि शिवसेना यांनी एकत्र आलंचं पाहिजे, अशी माझी श्रद्धा आहे.” असं ते भाजपा-शिवसेना युतीबद्दल म्हणाले.

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJPविक्रम गोखलेVikram Gokhale

Web Title: Vikram gokhales opinion about shiv sena bjp alliance kangana ranaut and prime minister modi msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.