• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. love story of aniket vishwasrao and sneha chavan avb

मैत्री, प्रेम, लग्न ते कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; अशी सुरु झाली होती अनिकेत विश्वासराव आणि स्नेहाची लव्हस्टोरी

अनिकेतच्या पत्नीने त्याच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याची तक्रार केली आहे.

Updated: November 17, 2021 11:03 IST
Follow Us
  • मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता अनिकेत विश्वासराव सध्या चर्चेत आहे.
    1/17

    मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता अनिकेत विश्वासराव सध्या चर्चेत आहे.

  • 2/17

    या चर्चा अनिकेतची पत्नी अभिनेत्री स्नेहा विश्वासरावने पती, सासू आणि सासरे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याची तक्रार केल्यानंतर सुरु झाल्या आहेत.

  • 3/17

    या प्रकरणी पुण्यातील अलंकार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 4/17

    अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाणने डिसेंबर २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली होती.

  • 5/17

    लग्नाचा कुठेही गाजावाजा न करता अगदी निवडक लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला होता.

  • 6/17

    अनिकेत आणि स्नेहाची ओळख हृदयात समथिंग समथिंग या चित्रपटाच्या वेळी झाली होती.

  • 7/17

    त्यानंतर हळूहळू त्यांच्यामध्ये घट्ट मैत्री झाली.

  • 8/17

    दरम्यान, त्याचवेळी स्नेहाच्या घरी तिच्या लग्नासाठी स्थळ शोधणे सुरु झाले होते.

  • 9/17

    स्नेहाची आई आणि अनिकेतची मावशी एकाच बिल्डिंगमध्ये राहतात. तसेच त्या एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी आहेत.

  • 10/17

    तर, अनिकेतच्या मावशीने स्नेहाचं स्थळ त्याच्या आईला सुचवले होते.

  • 11/17

    स्नेहाच्या घरी अनिकेत पसंत होता

  • 12/17

    त्यानंतर स्नेहा आणि अनिकेतने एकमेकांशी संवाद साधत लग्नाला होकार दिला.

  • 13/17

    ‘अनोळखी मुलीशी लग्न करण्यापेक्षा आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला’, असे अनिकेतने एका मुलाखतीमध्ये म्हटले होते.

  • 14/17

    हृदयात समथिंग समथिंग चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी त्यांचा साखरपुडा झाला होता.

  • 15/17

    त्यानंतर डिसेंबर २०१८मध्ये त्यांनी लग्न केले.

  • 16/17

    स्नेहाने ‘लाल इश्क’ या चित्रपटात भूमिका साकारली होती आणि तिची ही भूमिका गाजली देखील होती.

  • 17/17

    आता स्नेहाने अनिकेतच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Love story of aniket vishwasrao and sneha chavan avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.