-
अभिनेत्री सुवरीन चावला नेहमीच चित्रपटसृष्टीत चालणाऱ्या कास्टिंग काऊचबाबात बेधडकपणे बोलताना दिसते.
-
मागच्याच वर्षी एका मुलाखतीत सुवरीननं तिला अनेकदा आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवांवर भाष्य केलं होतं.
-
‘एका निर्मात्यानं क्लिवेज आणि मांड्या दाखवण्याची मागणी केली होती’ असा धक्कादायक खुलासा तिने या मुलाखतीत केला होता.
-
त्यानंतर अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सुवरीननं दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीबाबतही काही खळबळजनक खुलासे केले आहेत.
-
‘माझे वजन, कंबर आणि ब्रेस्ट साइझवरुन विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमुळे मला विचित्र अनुभव येऊ लागले. या अनुभवांमुळे मला स्वतःच्या योग्यतेवरही शंका येऊ लागली होती’ असं आपल्या पहिल्या चित्रपटाबद्दल बोलताना सुवरीन म्हणाली.
-
अभिनय क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर सुवरीनला कशाप्रकारे वजन, कंबर आणि ब्रेस्ट साइझवरून प्रश्न करण्यात आले याचा अनुभव तिने सांगितला.
-
‘कोणत्याही महिलेच्या शरीराची साइझ तिची योग्यता ठरवू शकत नाहीत’ असं आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सुवरीननं सांगितलं.
-
महिलांना पारखण्यासाठी या योग्य गोष्टी नाहीत असंही या मुलाखतीत सुवरीन म्हणाली.
-
सुवरीन चावला मागची काही वर्ष तणावग्रस्त आयुष्य जगत होती. पण आता यातून बाहेर पडली असल्याचंही तिनं सांगितलं.
-
सुवरीन म्हणाली, ‘पूर्वी अशा गोष्टींबाबत उघडपणे बोललं जात नव्हतं. पण आता वेळेनुसार अनेक गोष्टी बदलल्या आहेत.’
-
सुवरीन पुढे म्हणाली, ‘आता लोक उघडपणे कास्टिंग काऊच, बॉडी शेमिंग, मानसिक आरोग्य किंवा आयुष्यातील नकारांबद्दल बोलताना दिसत आहेत.’
-
सुवरीन चावला लवकरच आर माधवनसोबत ‘Decoupled’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे
-
हार्दिक मेहताचं दिग्दर्शन असेलेली ही वेब सीरिज येत्या १७ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
‘माझे वजन, कंबर आणि ब्रेस्ट साइझ…’, अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव
तिने यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ‘निर्मात्यानं क्लिवेज आणि मांड्या दाखवण्याची मागणी केली होती’ असा धक्कादायक खुलासा होता.
Web Title: Surveen chawla opens up on her casting couch experience in south film industry in interview avb