-
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात अभिनेता हेमंत बिरजे जखमी झाले आहेत. हेमंत बिरजे यांच्यासह त्यांची पत्नी रेश्मा आणि मुलगी आमना यादेखील जखमी झाल्या आहेत. ऊर्से टोलनाक्यावर हा अपघात झाला. गाडी दुभाजकाला धडकली आणि यामध्ये तिघेही जखमी झाले. तिघांवर सध्या पवना रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
-
हेमंत बिरजे यांनी सांगितल्यानुसार, “ते मुंबईहून पुण्याला निघाले होते. तिथे आमचं घर असून तिथे राहण्यासाठी चालला होते. तिकडे जाऊन आराम करण्याचा विचार होता”. पण यानित्ताने पुन्हा एकदा हेमंत बिरजे चर्चेत आले आहेत.
-
१९८५ मध्ये आलेल्या ‘टार्जन’ चित्रपटामुळे हेमंत बिरजे प्रसिद्धीस आले होते.
-
हेमंत बिरजे सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचे.
-
दिग्दर्शक बब्बर सुभाष आपल्या चित्रपटासाठी अभिनेत्याचा शोध घेत असताना त्यांची नजर हेमंत बिरजे यांच्यावर पडली होती. त्यानंतर हेमंत बिरजे यांना पहिला चित्रपट मिळाला. नंतर या चित्रपटातील लूकसाठी त्यांची तयारी करुन घेण्यात आली.
-
अभिनेत्री किमी काटकरसोबतच्या काही बोल्ड सीनमुळे चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती.
-
पण नंतर फ्लॉप चित्रपटांमुळे त्यांना काम मिळणं बंद होत गेलं आणि फक्त एका चित्रपटापुरते लक्षात राहिले.
-
यामुळे त्यांना आर्थिक संकटाचाही सामना करावा लागला.
-
त्यांनी मिथून चक्रवती, सलमान खान अशा मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं.
-
२०१६ मध्ये घरमालकाने त्यांना घराबाहेर काढल्याची माहितीही समोर आली होती.
-
हेमंत बिरजे सध्या बॉलिवूडपासून दूर आहेत. ते यश ते पुढे टिकवू शकले नाहीत आणि बॉलिवूडपासून दूर होत गेले.
PHOTOS: सेक्युरिटी गार्ड ते थेट सुपरस्टार; किमी काटकरसोबतच्या इंटिमेट सीन्समुळे रातोरात प्रसिद्धी, पण आता…
सुपरस्टार झाले होते सेक्युरिटी गार्डचं काम करणारे हेमंत बिरजे, पण नशिबाने दिली नाही साथ
Web Title: Journey of tarzan fame bollywood actor hemant birje from security guard to superstar sgy