• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. its sad that reality show winners dont get work later says apsara aali winner madhuri pawar nrp

“रिअ‍ॅलिटी शो विजेत्याची क्रेझ फक्त दोन-तीन महिनेच, त्यानंतर….”, ‘अप्सरा आली’ विजेत्या स्पर्धकाने सांगितला कटू अनुभव

काही महिन्यांपूर्वी ‘देवमाणूस’ या मालिकेच्या पहिल्या भागात दिसली होती.

January 15, 2022 15:12 IST
Follow Us
  • छोट्या पडद्यावरील संगीत आणि नृत्यावर आधारित 'अप्सरा आली' हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय ठरला होता. या कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले होते.
    1/17

    छोट्या पडद्यावरील संगीत आणि नृत्यावर आधारित ‘अप्सरा आली’ हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय ठरला होता. या कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले होते.

  • 2/17

    महाराष्ट्राची लोककला लावणी आणि इतर नृत्यांवर हा शो आधारित होता. या शो च्या पहिल्या पर्वाची विजेती साताऱ्याची माधुरी पवार ठरली होती.

  • 3/17

    ‘अप्सरा आली’ या रिअॅलिटी शोमधून माधुरी ही घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत नंदिता वहिनी म्हणजेच वहिनीसाहेबांची भूमिका साकारली होती.

  • तसेच काही महिन्यांपूर्वी ‘देवमाणूस’ या मालिकेच्या पहिल्या भागात दिसली होती. यात तिने चंदाचे पात्र साकारले होते.
  • 4/17

    माधुरी पवार ही मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आहे. नृत्यासह तिच्या अभिनयामुळे घराघरात तिला ओळखले जाते.

  • 5/17

    नुकतंच माधुरीने ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या वेबसाईटला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या सिनेसृष्टीतील प्रवासासह खडतर प्रवासाबद्दल सांगितले.

  • 6/17

    “माझ्या कुटुंबात ‘एमबीए’ करणारी मी एकटीच आहे. माझ्या कुटुंबात इतर अनेक लोक आहेत ज्यांचे फारसे शिक्षण झालेले नाही किंवा कोणती पदवीही घेतलेली नाही. मला अभ्यासाची प्रचंड आवड होती. त्यासोबत लहानपणापासून मला नृत्य आणि अभिनय करणेही प्रचंड आवडायचे. त्यामुळे मी टीव्हीवरील अनेक कार्यक्रम पाहायची,” असे माधुरी म्हणाली.

  • “मी सिनेसृष्टीत येण्यापूर्वी मला अनेकदा नकाराचा सामना करावा लागला. मी अनेकदा ‘महाराष्ट्राचा सुपर डान्सर’ या मालिकेसाठी ऑडिशन दिली होती. हा एक लोकप्रिय शो होता,” असे ती म्हणाली.
  • 7/17

    “मी ऑडिशन दिले. त्यावेळी मी नृत्य कौशल्य दाखवले. पण त्यानंतर माझ्या जीवनात कोणता संघर्ष नसल्यामुळे मला नाकारण्यात आले,” असे तिने सांगितले.

  • 8/17

    “गेल्या अनेक वर्षांपासून निर्माते हे स्पर्धकांच्या कौशल्यापेक्षा फक्त त्यांच्या जीवनकथेवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे तुमच्या जीवन संघर्षकथा असणे बंधनकारक आहे. हा टीआरपीचा खेळ आहे. पण मला वाटते की प्रथम त्या स्पर्धकाचे कौशल्य पाहायला हवे. यामुळेच अनेक प्रतिभावान लोकांना अजूनही व्यासपीठ मिळत नाही,” असेही माधुरीने म्हटले.

  • 9/17

    “एकदा सहजच मी ‘अप्सरा आली’ या शोसाठी ऑडिशन दिले होते. त्यावेळी मला वाटले की या लोकांकडून मला कोणताही कॉल परत येणार नाही. पूर्वी आलेल्या अनुभवाप्रमाणे हा शो मला नकार देईल. पण त्याच्या नेमके उलट झाले.” असेही ती म्हणाली.

  • 10/17

    “मला अचानक फोन आला. त्यात माझी निवड झाली असल्याचे त्यांनी मला सांगितले. या शोमध्ये मी सर्वोत्तम प्रदर्शन केले. तीन महिन्यांचा मेहनत केली आणि त्या शो ची विजेती झाले. यानंतर लोकांनी मला शुभेच्छा दिल्या, माझा विजय साजरा केला. पण त्यानंतर मुख्य प्रवास सुरू झाला,” असेही ती म्हणाली.

  • “मी अप्सरा आली हा शो जिंकला. पण त्यानंतर काहीही झाले नाही. विशेष म्हणजे हा शो सुरु असताना मी अनेक कार्यक्रमांना उपस्थित असायची. पण हा रिअॅलिटी शो जिंकल्यानंतर मला त्यानंतर काही काम मिळत नव्हते. हे माझ्या आयुष्यातील दुख:द सत्य आहे. जे मी स्वत: अनुभवले आहे,” असेही तिने सांगितले.
  • 11/17

    “एखाद्या रिअॅलिटी शो विजेत्याची क्रेझ फक्त दोन-तीन महिनेच चालते. त्यानंतर सर्वच त्यांना विसरतात. मराठी टीव्हीवर अनेक रिअॅलिटी शो झाले आहेत. पण आता त्याचे विजेते कुठे आहेत? ते काय करत आहेत? यातील बहुतेक जण हे रिकामे बसून काम मागत आहेत. हे कटू सत्य आहे,” असेही ती म्हणाली.

  • “जेव्हा मला काम मिळत नव्हते तेव्हा मी डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यानंतर मी सोशल मीडियावर जास्तीत जास्त व्हिडीओ करू लागली आणि त्या माध्यमातून मला माझ्या नैराश्यावर मात करण्यास मदत झाली,” असेही तिने सांगितले.
  • “मी रातोरात सोशल मीडिया स्टार बनले. पण त्यानंतर अनेक जण मला रिअॅलिटी शो विजेता किंवा अभिनेत्रीपेक्षा जास्त एखादी सोशल मीडिया स्टार म्हणून ओळखायचे. एक कलाकार म्हणून ही दुःखाची गोष्ट होती,” असेही तिने सांगितले.
  • 12/17

    ‘देवमाणूस’ या मालिकेत माधुरीने चंदा हे पात्र साकारले होते. याबाबत बोलताना ती म्हणाली की, “माझ्या करिअरमधील हा एक मैलाचा दगड होता. ही भूमिका छोटी असली तरी मला या शोमधून खूप काही मिळाले. या मालिकेचा दुसऱ्या भागाच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षकांना भेटण्याची संधी मिळेल का?” हे पाहावं लागेल.

Web Title: Its sad that reality show winners dont get work later says apsara aali winner madhuri pawar nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.