-
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं आज वयाच्या ९३व्या वर्षी निधन झालं आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं समोर आलं आहे. रमेश देव यांच्या निधनामुळे मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्यासोबत काम केलेले, त्यांच्याशी स्नेह असणारे असे अनेक मराठी कलाकार त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.
-
रमेश यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी तब्बल १८० हून जास्त चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी अभिनयातून ठसा उमटवला होता. त्यांचे लाखो चाहते आहेत.
-
दिलखुलास व्यक्तिमत्त्व, अत्यंत मनमिळाऊ स्वभाव यामुळे ऑफस्क्रिनही रमेश देव यांचा चाहता वर्ग मोठा होता.
-
‘२०१३ साली रमेश देव यांना ११व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
-
‘पाटलाचं पोर’, ‘सुवासिनी’, ‘झेप’, ‘अपराध’, ‘सर्जा’, ‘या सुखांनो या’, ‘आनंद’, ‘कसौटी’, ‘फटाकडी’, ‘जय शिवशंकर’, ‘तीन बहुरानियाँ’ असे त्यांचे अनेक गाजलेले चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते.
-
याशिवाय अनेक नाटके आणि मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. २००६ साली आलेल्या निवडुंग या मालिकेतील त्यांची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली होती.
-
रमेश देव यांच संपूर्ण कुटुंब हे अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे.
-
त्यांनी कधीच फक्त हीरोची भूमिका करायची असा हट्ट धरला नाही. त्यांना नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी हीरोची भूमिका साकारली. तर हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली.
-
रमेश देव यांचा जन्म कोल्हापुरमध्ये झाला होता. ते मूळचे राजस्थानच्या जोधपूरमधील ठाकूर घराण्यातील होते.
-
रमेश देव यांचं मूळ आडनाव खरंतर ठाकूर असं होतं.
-
रमेश देव यांचे वडील राजर्षी शाहू महाराज यांच्या काळात न्यायलयीन कामाकाजात मदत करत होते.
-
त्यावेळी रमेश देव यांच्या वडिलांनी शाहू महाराजांना मदत केलेली.
-
तेव्हा शाहू महाराज हे रमेश देव यांच्या वडिलांना उद्देशून म्हणाले होते, की तुम्ही ठाकूर नाही, तरदेव आहात.
-
तेव्हापासून खरंतर ठाकूर हे आडनाव जाऊन सगळेजण त्यांना देव या आडनावानेच संबोधू लागले होते.
-
१९५६ साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या चित्रपटातून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. (Photo Credit : File Photo/ Indian Express)
राजस्थानचे मुळचे ठाकूर असे झाले ‘देव’, रमेश देव यांचा प्रवास…
Web Title: Ramesh deo his career and his surname interesting story dcp