-
जगभरात ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस स्त्रीत्वाचा उत्सव म्हणून ओळखला जातो.
-
बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वात अनेक सिंगल मदर आहेत. या महिला दिनानिमित्त सिनेसृष्टीत सिंगल मदर असून मुलाचा सांभाळ करणाऱ्या महिलांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
-
सुष्मिता सेन ही गेल्या अनेक वर्षांपासून एकल पालकत्वाची जबाबदारी सांभाळत आहे. ती अद्याप अविवाहित आहे. सुष्मितानं २००० साली तिची मोठी मुलगी रेनी हिला दत्तक घेतलं होतं. त्यानंतर २०१० साली तिनं अलिशाला दत्तक घेतलं. तिचे तिच्या दोन्ही मुलींसोबत खूप चांगलं बॉन्डिंग आहे. ती नेहमी त्यांच्यासोबत व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते.
-
अभिनेत्री जुही परमार छोट्या पडद्यावरील ‘कुम कुम एक प्यारासा बंधन’ या मालिकेतून प्रकाश झोतात आली. काही वर्षांपूर्वी जुही परमार आणि सचिन श्रॉफ या प्रसिद्ध जोडीने घटस्फोट घेतला. त्या दोघांना समायरा ही मुलगी आहे. समायरा ही सध्या तिच्या आईसोबत राहते.
-
टीव्ही मालिकांमधून अभिनय करणाऱ्या उर्वशी ढोलकिया वयाच्या १६व्या वर्षी लग्न केले होते. अवघ्या १७ वर्षाची असताना तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. सागर आणि क्षितिज अशी त्या दोघांची नावे आहेत. ती एक सिंगल मदर आहे.
-
अभिनेत्री श्वेता तिवारी ही तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. श्वेता तिवारी तिच्या दोन लग्नांमुळे कायम चर्चेत राहिली आहे. श्वेताला दोन मुलं आहेत. तिचा मुलगा रेयांश हा ४ वर्षांचा आहे तर तीची मोठी मुलगी पलक ही 20 वर्षांची आहे.
-
अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा घटस्फोट बॉलिवूडच्या सर्वाधिक चर्चित घटस्फोटांपैकी एक आहे. करिश्मा आणि संजय कपूर या दोघांना एक मुलगी आणि मुलगा आहे. तिच्या मुलीचं नाव समायरा आणि मुलाचं नाव किशन आहे. घटस्फोटानंतर करिश्मा एकटी मुलांचा सांभाळ करत आहे.
-
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता या सिंगल मदर आहेत. वेस्ट इंडिजच्या संघातील माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांना मसाबा ही मुलगी आहे. मसाबा गुप्ता प्रसिद्ध फॅशन डिझायनर असून या मायलेकी विवियन रिचर्ड्ससोबत राहत नाहीत.
-
बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदी ९० च्या दशकात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी म्हणून ओळखली जाते. फरहान फर्निचरवाल्याशी पूजा विवाहबंधनात अडकली. २००३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आलिया फर्निचरवाला ही पूजा आणि फरहानची मुलगी आहे. आलियाने सैफ अली खानच्या ‘जवानी जानेमन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
सुष्मिता सेन ते करिश्मा कपूर, ‘या’ बॉलिवूड अभिनेत्री आहेत ‘सिंगल मदर्स’
या महिला दिनानिमित्त सिनेसृष्टीत सिंगल मदर असून मुलाचा सांभाळ करणाऱ्या महिलांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
Web Title: International women day 2022 these 7 actresses who are proud single moms nrp