-
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या लोकप्रिय मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली.
-
या मालिकेतील यश आणि नेहाची जोडी आणि परीचा निरागस अभिनय या गोष्टींमुळे मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं.
-
या मालिकेतील अनेक रंजक वळणं प्रेक्षकांना खिळवून ठेवतात आणि ही मालिका नुकतीच एका विलक्षण वळणावर आली आहे.
-
यश आणि नेहा या दोघांनीही एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली आहे.
-
त्यानंतर आता हे दोघेही होळीच्या रंगात न्हावून निघाल्याचे दिसत आहे.
-
नेहा, यश आणि परी पहिल्यांदाच एकमेकांसोबत एकत्र होळीचा सण साजरा करणार आहेत.
-
त्यामध्ये यश नेहाला तिचं आयुष्य रंगांनी भरून टाकणार अशी कबूली देताना दिसणार आहे.
-
त्यामुळे त्यांच्या या प्रेमकथेला धुळवडीचा रंग चढणार आहे.
-
यश आणि नेहाच्या या धुळवडीचे फोटो झी मराठीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
यात त्या दोघांच्या चेहऱ्यावर गुलाबी रंग पाहायला मिळत आहे.
-
दरम्यान श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांनी या मालिकेच्या निमित्तानं पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं.
-
फारच कमी कालावधीत या मालिकेनं प्रेक्षकांना आपलंस केलं आहे.
-
प्रार्थना आणि श्रेयस यांची जोडी तर छोट्या पडद्यावर गाजताना दिसत आहे.
-
एवढंच नाही तर परी म्हणजेच मायरा हिचाही अभिनय सर्वांची मनं जिंकून घेत आहे.
“आला होळीचा सण लय भारी…”, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत धुळवडीचे जोरदार सेलिब्रेशन
त्यामुळे त्यांच्या या प्रेमकथेला धुळवडीचा रंग चढणार आहे.
Web Title: Shreyas talpade prarthana behere in majhi tuzhi reshimgaath yash and neha holi celebration photos nrp