Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. the kashmir files director vivek agnihotri pallavi joshi love story sgy

PHOTOS: ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचं मराठी कनेक्शन माहितीये का?

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटामुळे बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या चांगलेच चर्चेत आहेत

Updated: March 16, 2022 17:17 IST
Follow Us
  • 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटामुळे बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या चांगलेच चर्चेत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
    1/15

    ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटामुळे बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या चांगलेच चर्चेत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

  • 2/15

    काश्मिरी पंडितांच्या वेदना मांडणारा हा चित्रपट अनेक रेकॉर्ड करत आहे. यानिमित्ताने विवेक अग्निहोत्री यांचं नाव चांगलंच चर्चेत आहे.

  • 3/15

    पण तुम्हाला त्यांचं मराठी कनेक्शन माहिती आहे का?

  • 4/15

    ‘द काश्मीर फाईल्स’ मराठमोठी अभिनेत्री पल्लवी जोशीदेखील प्रमुख भूमिकेत असून त्या विवेक अग्निहोत्रींच्या पत्नी आहेत.

  • 5/15

    त्यांची ही लव्हस्टोरीदेखील एखाद्या चित्रपटाप्रमाणेच आहे. पहिल्या भेटीत अजिबात न आवडलेले विवेक अग्निहोत्री नंतर पल्लवी जोशी यांचे पती कसे झाले जाणून घ्या…

  • 6/15

    विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांची पहिली भेट रॉक कॉन्सर्टमध्ये झाली होती. पण पहिल्या भेटीत पल्लवी जोशी यांना विवेक अग्निहोत्री आवडले नव्हते. त्यांना विवेक अग्निहोत्री थोडे गर्विष्ठ वाटले होते.

  • 7/15

    शादी टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी पल्लवी जोशी यांच्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीचा उल्लेख करताना सांगितलं होतं की, “आम्ही १९९० मध्ये एका रॉक कॉन्सर्टमध्ये भेटलो होतो. पल्लवीला तेव्हा मी ओळखत नव्हतो, पण आमच्यात काहीतरी साधर्म्य असल्याचं मला जाणवत होतं. कदाचित त्यामुळेच आम्ही दोघंही त्या कॉन्सर्टमध्ये कंटाळलो होतो”.

  • 8/15

    तर पल्लवी यांनी सांगितलं होतं की, “मला तहान लागली होती आणि विवेक माझ्यासाठी पाणी घेऊन आले होते”.

  • 9/15

    मला विवेक पहिल्या भेटीत आवडले नव्हते. मला ते गर्विष्ठ वाटले होते. तेव्हा ते अॅड मॅन होते असं पल्लवी यांनी सांगितलं होतं.

  • 10/15

    नंतर मात्र विवेक आणि पल्लवी यांच्यातील धागे जुळू लागले. दोघेही पर्सनल आणि प्रोफेशनल अशा दोन्ही ठिकाणी एकमेकांना चांगल्या पद्धतीने ओळखू लागले.

  • 11/15

    तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २८ जून १९९७ ला दोघे विवाहबंधनात अडकले. त्यांना दोन मुलं आहेत.

  • 12/15

    विवेक आणि पल्लवी यांनी अनेक प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम केलं आहे. विवेक यांचं म्हणणं आहे की, पल्लवीसोबत काम केल्याने आपल्यातील नातं अधिक दृढ झालं.

  • 13/15

    ते म्हणतात की, या लग्नाचा आमच्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे. आम्ही दोघेही एकमेकांच्या कामाचा आदर करतो.

  • 14/15

    विवेक आणि पल्लवी यांच्यातील नातं पती-पत्नीपेक्षा मैत्रीचं अधिक आहे. जर तुमच्या नात्यात मैत्री नसेल तर लग्न फक्त एक औपचारिकता असते असं विवेक यांचं म्हणणं आहे.

  • 15/15

    ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल बोलायचं गेल्यास पल्लवी आणि विवेक दोघेही याच्याशी संबंधित आहेत. पल्लवी या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत, तसंच चित्रपटातही महत्वाची भूमिका निभावली आहे.

TOPICS
द काश्मीर फाइल्सThe Kashmir Files

Web Title: The kashmir files director vivek agnihotri pallavi joshi love story sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.