• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. star pravah parivar puraskar 2022 popular tv serial actor met technicians family at their home shares an emotional post photos sdn

Photos : टीव्हीवरील सिताऱ्यांनी घेतली पडद्यामागील कलाकारांच्या कुटुंबीयांची भेट; स्टार प्रवाह सोहळ्यातील भावूक क्षण

April 2, 2022 08:45 IST
Follow Us
  • Star Pravah Parivar Puraskar 2022
    1/12

    परिवार असतो जिवाभावाचा, प्रेमाचा आणि विश्वासाच्या घट्ट नात्यांचा. जेव्हा सारे एकत्र येतात तेव्हा सोहळा होतो आनंदाचा, आपुलकीचा आणि कौतुकाचा.

  • 2/12

    स्टार प्रवाहवरील मालिकांमधली प्रत्येक पात्र आपल्या परिवाराचा महत्त्वाचा भाग आहेत. प्रेक्षक घरबसल्या मालिकेच्या माध्यमातून आपल्या आवडत्या कलाकारांना भेटत असतात.

  • 3/12

    स्टार प्रवाह परिवार पुरस्काराच्या निमित्ताने संपूर्ण प्रवाह परिवार एकत्र येणार आहे. दर्जेदार कार्यक्रमांचा हा डोलारा उभा करण्यात कलाकार आणि दिग्दर्शकांसोबतच तंत्रज्ञांचाही मोलाचा वाटा असतो.

  • 4/12

    या मंडळींशिवाय प्रवाह कुटुंब पूर्ण होऊच शकत नाही. कलाकारांना घरोघरी पोहचवणारी ही मंडळी मात्र पडद्यामागे राहून सूत्र हलवत असतात. याच सदस्यांना स्टार प्रवाहच्या कलाकारांनी दिलं एक खास सरप्राईज. मालिका घडवण्यात दिवसरात्र राबणाऱ्या या तंत्रज्ञांच्या घरी पोहोचली स्टार प्रवाहच्या कलाकारांची स्वारी.

  • 5/12

    एक दिवस शूटिंगला ब्रेक देत स्टार प्रवाहच्या कलाकारांनी हा दुग्धशर्करा योग जुळवून आणला.

  • 6/12

    दैनंदिन मालिका साकारण्यासाठी कलाकार आणि दिग्दर्शकांबरोबरच मोलाचं योगदान देणाऱ्या सेटवरील तंत्रज्ञांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन कलाकारांनी त्यांच्या परिवाराची भेट घेतली.

  • 7/12

    पाहुणे येती घरा तोचि दिवाळी दसरा ही म्हण प्रचलित आहेच. मात्र आम्हीही तुमच्या परिवाराचा एक भाग आहोत ही भावनाच सुखावणारी होती.

  • 8/12

    आपल्या परिवाराचं प्रेम नेमकं काय असतं हे त्यादिवशी ‘आई कुठे काय करते’, ‘रंग माझा वेगळा’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘फुलाला सुगंध मातीचा’ आणि ‘मुरांबा’ मालिकेतील कलाकारांनी अनुभवलं. तर तंत्रज्ञांच्या कुटुंबासाठीही आपल्या लाडक्या कलाकारांची ही भेट अविस्मरणीय ठरली.

  • 9/12

    मनसोक्त गप्पा तर रंगल्याच मात्र थोरामोठ्यांना नमस्कार करताना जयदीप ही व्यक्तिरेखा साकारणारा मंदार जाधव, गौरी म्हणजेच गिरिजा प्रभू आणि मुरांबा मालिकेतील अक्षय म्हणजेच अभिनेता शशांक केतकर, शिवानी मुंढेकर भावूक झाले होते.

  • 10/12

    ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजना, अनिरुद्ध आणि ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील सौंदर्या इनामदारही या खास भेटीने भारावून गेल्या होत्या.

  • 11/12

    स्टार प्रवाह वाहिनी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत असते.

  • 12/12

    या आगळ्या वेगळ्या भेटीने नात्यातला गोडवा वाढला असणार हे नक्कीच. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण प्रवाह परिवार भेटीला येणार आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Star pravah parivar puraskar 2022 popular tv serial actor met technicians family at their home shares an emotional post photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.