-
स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या मे महिन्यापासून ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाला आहे.
-
गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट या मालिकेतून सांगितली जाणार आहे.
-
सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानिटकर-कोठारे तब्बल १२ वर्षांनंतर या मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करणार आहे.
-
‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतील चिमुकल्या स्वराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.
-
गाण्याच्या दुनियेत हरवून जाणाऱ्या स्वराची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराचे नाव अवनी तायवाडे असे आहे.
-
पण ही अवनी नेमकी आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
-
अवनी तायवडे ही अवघ्या ८ वर्षांची आहे. ती तिच्या कुटुंबासोबत नागपुरात राहते.
-
अवनीने आतापर्यंत अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.
-
सोनी वाहिनीवरील ‘स्टोरी ९ मन्थ्स की’ (Story 9 Months Ki) या मालिकेतून तिने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
-
त्यानंतर स्टार प्लसवरील ‘ये है चाहते’ या हिंदी मालिकेत तिने साचीचे पात्र साकारले होते.
-
या मालिकेनंतर आता ती स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत झळकणार आहे.
-
अवनीची ही पहिलीच मराठी मालिका आहे.
-
त्यासोबतच लवकरच अवनी ही ‘कुलूप’ या मराठी चित्रपटातही काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ रुद्र कर्पे यांनी केले आहे.
-
अवनीला लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. त्यामुळेच तिची आई श्वेता अन्वीला अभिनय क्षेत्रात येण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देत असते.
-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका हिंदी मालिकेचा रिमेक असणार आहे.
-
बंगाली मालिका पोटोल कुमार गानवाला आणि हिंदीतील कुल्फीकुमार बाजेवाला या दोन मालिकेवरुन याची निर्मिती करण्यात येत आहे.
-
या मालिकेतून उर्मिला कोठारे आणि अभिजीत खांडकेकर प्रथमच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.
-
उर्मिला ही या मालिकेत वैदेहीचे पात्र साकारत आहे.
-
तर अभिजीत खांडकेकर हा स्वराच्या वडिलांच्या भूमिकेत झळकणार आहेत.
‘तुझेच मी गीत गात आहे’ मधील चिमुकल्या ‘स्वरा’ने वेधले सर्वांचेच लक्ष, कोण आहे ती? जाणून घ्या
‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतील चिमुकल्या स्वराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.
Web Title: Marathi serial tujhech mi geet gaat aahe know about swara fame child artist avani taywade nrp