-
‘रामायण’ मालिकेमध्ये रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल छोट्या पडद्यामुळे घराघरांत पोहेचले. त्यांची राम ही भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतली. मात्र या मालिकेनंतर त्यांना काम मिळणं बंद झालं होतं.
-
‘रामायण’ नंतर निर्माते इतर भूमिकांसाठी विचारणा करत नसल्याची खंत अरुण यांनी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केली होती. यामुळे त्यांच्या करिअरला ब्रेक लागला होता.
-
‘रामायण’ मालिकेमध्ये सीताची भूमिका साकरणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया हिच्या बाबतीत देखील असंच काहीसं घडलं होतं. तिची सीता ही भूमिका गाजल्यानंतर वेगळ्या रुपामध्ये दीपिकाला पसंत करणं प्रेक्षकांनी टाळलं होतं.
-
दीपिकाने ‘सुन मेरी लैला’ चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने अनेक चित्रपट केले. पण सीता या भूमिकेमुळे ती अधिक नावारूपाला आली.
-
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमुळे अभिनेत्री हिना खानला प्रसिद्धी मिळाली. या मालिकेमध्ये तिने साकारलेली आदर्श सूनेची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पण आजही तिला त्याच प्रकारच्या भूमिकेमध्ये पाहणं प्रेक्षक पसंत करतात.
-
हिनाने वेब सीरिज, चित्रपटांमध्ये काम केलं असलं तरी तिला अजूनही त्यामध्ये फारसं यश आलेलं नाही. बराच काळ एकच भूमिका करत असल्यास त्याच टाइपकास्टमध्ये तुम्ही मोडले जाता असे हिनाने एका मुलाखतीमध्ये देखील म्हटलं होतं.
-
अभिनेत्री उर्वशी ढोलकियाने वयाच्या ६व्या वर्षी अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की’, ‘कभी सौतन कभी सहेली’, ‘कहीं तो होगा’ या मालिकांमुळे तिच्या करिअरला नवं वळण मिळालं.
-
‘कसौटी जिंदगी की’ मध्ये तिने साकारलेली कोमोलिकाची भूमिका फारच गाजली. पण आजही लोकं तिला याच भूमिकेच्या नावाने ओळखतात. तिच्या प्रत्येक भूमिकेमध्ये कोमोलिकाला शोधण्याचा प्रयत्न करतात.
-
. ‘साथ निभाना साथिया’ मालिकेमध्ये अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने गोपी बहूची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या इतकी पसंतीस पडली की तिला या नावाने लोकं ओळखू लागले.
-
देवोलिनाला या मालिकेमुळे यश मिळालं असलं तरी तिला नव्या अवतारामध्ये पाहणं लोक पसंत करत नाहीत. तिने मॉडर्न राहण्याचा प्रयत्न केला तरी चाहते तिची तुलना गोपी बहू या भूमिकेशी करतात.
-
अभिनेत्री शिल्पा शिंदेच्या बाबतीतही असाच किस्सा घडला होता. ‘भाभीजी घर पर है’ मालिकेमध्ये शिल्पाने अंगुरी भाभी ही भूमिका साकारली. आजही तिला याच भूमिकेच्या नावाने ओळखलं जातं.
-
शिल्पाने छोट्या पडद्यावरील इतर शोज्, चित्रपट केले. २०२०मध्ये ती ‘पौरुषपुर’ या वेबसीरिजमध्ये फक्त दिसली. मात्र त्यांनंतर तिला कोणतीच ऑफर आली नाही. (सौजन्य – सगळे फोटो इन्स्टाग्राम)
स्वतःच्या गाजलेल्या भूमिकांमुळे कलाकारांना काम मिळणं झालं कठीण, कोण आहेत हे ६ स्टार्स?
छोट्या पडद्यावरील काही कलाकार मालिकांमधील त्यांच्या भूमिकांमुळे नावारुपाला आले. मात्र त्यांच्या याच भूमिकांमुळे बराच काळ अभिनयक्षेत्रात काम मिळणं त्यांच्यासाठी कठीण होऊन बसलं होतं.
Web Title: Television actor actress struggle for career because of typecast role kmd