-
दाक्षिणात्या सुपरस्टार अभिनेत्यांच्या यादीमध्ये ज्युनिअर एनटीआरचं नाव आवर्जुन घेतलं जातं.
-
हा अभिनेता त्याच्या चित्रपटांसाठी कोट्यावधी रुपयांचा मानधन देखील घेतो.
-
त्याच्याकडे असलेली संपत्ती ऐकून खरं तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
-
ज्युनिअर एनटीआरकडे कोटी रुपयांचे बंगले, महागड्या गाड्या आहेत.
-
सध्या तो राहत असलेल्या बंगल्याची किंमत २५ कोटी रुपयांच्या घरात आहे.
-
परदेशात देखील या अभिनेत्याने कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्याच्याकडे ४ कोटी रुपयांचं सगळ्यात महागडं घड्याळ आहे.
-
त्याचबरोबरीने बंगळूर, कर्नाटकमध्ये देखील ज्युनिअर एनटीआरने गुंतवणूक केली असल्याचं बोललं जातं.
-
ज्युनिअर एनटीआरकडे त्याचं स्वतःचं जेट देखील आहे. त्याची किंमत जवळपास ८० कोटी रुपये इतपत आहे.
-
या अभिनेत्याकडे बीएमडब्ल्यु, लॅम्बोर्गिनी, रेंज रोव्हर सारख्या महागड्या गाड्या आहेत. ज्युनिअर एनटीआर जवळपास ६० मिलियन डॉलर म्हणजेच ४५० कोटी रुपयांचा मालक असल्याचा देखील बोललं जातं. (फोटो – इन्स्टाग्राम, फाईल फोटो)
४ कोटी रुपयांचं घड्याळ, चार्टर विमान अन् बरंच काही, ज्युनिअर एनटीआरची संपत्ती ऐकून व्हाल थक्क
दाक्षिणात्या सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचे जगभरात चाहते आहेत. या अभिनेत्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर कलासृष्टीमध्ये आपलं स्थान बळकट केलं. ज्युनिअर एनटीआर दिसायला जरी साधा असला तरी तो कोट्यावधी रुपयांचा मालक आहे. यावरच आपण एक नजर टाकणार आहोत.
Web Title: Fabulous look the most expensive assets of one of the biggest south stars junior ntr kmd