-
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.
-
अनुष्का ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
-
नुकतंच अनुष्का शर्माने दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीला हजेरी लावली.
-
करण जोहरने ५० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत अनेक कलाकार सहभागी झाले होते.
-
यावेळी अनुष्का शर्मा ही अतिशय ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमध्ये पार्टीसाठी पोहोचली.
-
या पार्टीसाठी अनुष्काने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. त्यासोबत तिने छान मेकअपही केला होता.
-
अनुष्काने या पार्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
“मला आज झोपण्यासाठी दोन तास उशीर झाला आहे. पण मी खूप छान दिसत आहे”, असे कॅप्शन अनुष्का शर्माने दिले आहे.
-
अनुष्काने शेअर केलेल्या या फोटोवर तिचा पती आणि क्रिकेटपटू विराट कोहलीनेही कमेंट केली आहे.
-
विराटने तिच्या या फोटोंवर ‘छान’ असे लिहित हार्ट इमोजी शेअर केले आहेत.
अनुष्का शर्माने पार्टीसाठी परिधान केला ग्लॅमरस ड्रेस, विराट कोहली म्हणाला…
अनुष्का ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.
Web Title: Anushka sharma sets instagram on fire with her karan johar party look virat kohli comment nrp