-
प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूड चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे.
-
पण त्याचबरोबरीने अमेरिकमध्ये तिने नवीन व्यवसायाला सुरुवात केली आहे.
-
‘सोना होम’ नावाचा नवीन ब्रँड तिने लाँच केला आहे.
-
इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्रियांकाने याबाबत माहिती दिली.
-
डिनर सेट, क्रॉकरीसारख्या वस्तू या ब्रँडच्या माध्यमातून प्रियांका लोकांपर्यंत पोहोचवणार आहे.
-
विशेष म्हणजे या सगळ्या वस्तूंना प्रियांकाने भारतीय टच देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय संस्कृती जपण्याचा यामागचा तिचा हेतू आहे.
-
परदेशामध्ये राहत असलेल्या भारतीय लोकांना आपल्या संस्कृतीचा विसर पडू नये म्हणून तिने ही नवी कल्पना शोधून काढली आहे.
-
डिनर सेट, क्रॉकरीसारख्या वस्तूंवर पारंपरिक भारतीय डिझाईन ‘सोना होम’च्या माध्यमातून लोकांना पाहायला मिळणार आहे.
-
“भारतामधून अमेरिकेमध्ये आल्यावर आपलं अस्तित्व निर्माण करत व्यवसाय सुरु करणं माझ्यासाठी आव्हानात्मक होतं.” असं प्रियांकाने ब्रँड लाँच करताना म्हटलं आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)
प्रियांका चोप्राने अमेरिकेमध्ये सुरु केला नवा व्यवसाय, भारतीय संस्कृती जपण्यासाठी अभिनेत्रीने काय केलं पाहा?
अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूड चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. पण त्याचबरोबरीने तिने नव्या व्यवसायाला देखील सुरुवात केली आहे. अमेरिकेमध्ये भारतीय रेस्तराँ सुरु केल्यानंतर प्रियांकाने ‘सोना होम’ नावाचा नवा ब्रँड सुरु केला आहे.
Web Title: Priyanka chopra started news business in america launches homeware brand name sona home see details and photos kmd