-
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. ‘बिग बॉस मराठी’ हा शो लोकप्रिय शोपैकी एक आहे.
-
‘बिग बॉस’चे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
काही दिवसांपूर्वी या शोचा टीझर प्रदर्शित करण्यात झाला होता.
-
तसेच या शोमध्ये नवीन बऱ्याच गोष्टी पाहायला मिळणार असल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत.
-
‘बिग बॉस’चे ४ थे पर्व सिद्धार्थ जाधव होस्ट करणार असल्याचेही बोललं जात आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
-
त्यानंतर आता ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नाव समोर येण्यास सुरुवात झाली आहे.
-
नुकतचं बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वात कोणते कलाकार असणार याची एक संभाव्य यादी समोर आली आहे.
-
या सर्व यादीत अनेक मोठमोठ्या कलाकारांचा सहभाग आहे.
-
तर यातील काही कलाकार हे कायमच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागी होणाऱ्या कलाकारांमध्ये पहिले नाव अभिनेत्री अलका कुबल यांचे घेतले जात आहे. अलका कुबल ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत झळकल्या होत्या.
-
अभिनेत्री शुभांगी गोखले – मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिका विश्वात आपल्या दमदार अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे.
-
हार्दिक जोशी – तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून घराघरात पोहोचलेला राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी सुद्धा बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात दिसणार असल्याची शक्यता आहे.
-
प्राजक्ता गायकवाड – प्राजक्ता ही गेल्या वर्षभरात विविध कारणांमुळे चर्चेत होती. त्यामुळे ती देखील बिग बॉसमध्ये सहभागी होऊ शकते असं बोललं जात आहे.
-
किरण माने – बिग बॉसच्या घरात सहभागी होणाऱ्या यादीतील एक संभाव्य नाव म्हणजे किरण माने. मुलगी झाली हो या मालिकेमुळे ते चांगलेच प्रसिद्धीझोतात आले होते.
-
देवमाणूस मालिकेत झळकलेली अभिनेत्री नेहा खान हिचेही नाव बिग बॉसच्या ४ पर्वातील स्पर्धकांमध्ये घेतलं जात आहे.
-
अभिनेत्री सोनल पवार हिने अनेक मराठी मालिकेत दमदार भूमिका साकारल्या आहेत.
-
‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम माया उर्फ अभिनेत्री रुचिरा जाधव ही देखील बिग बॉसमध्ये सहभागी होणार असल्याचे बोललं जात आहे. तिने अनेक मालिका आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे.
-
गेल्या अनेक वर्षांपासून मालिका आणि सिनेसृष्टीत कार्यरत असणारी अभिनेत्री शर्वरी लोहकरेचे नाव बिग बॉसच्या संभाव्य यादीत पाहायला मिळत आहे. सध्या ती तुमची मुलगी काय करते मालिकेत एका हटके भूमिकेत दिसत आहे.
-
फुलपाखरू मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता यशोमन आपटे याचंही नाव बिग बॉस मराठीसाठी चर्चेत आहे.
-
लागिरं झालं जी मालिकेत दिसून आलेला अभिनेता निखिल चव्हाण याचे नावही बिग बॉसच्या संभाव्य यादीत पाहायला मिळत आहे.
-
अभिनेता अनिकेत विश्वासराव हा देखील बिग बॉसमध्ये दिसण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची बायको स्नेहल चव्हाण हिने घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते.
-
अभिनेत्री दीप्ती लेले ही देखील बिग बॉसमध्ये झळकू शकते असा अंदाज लावला जात आहे. दीप्ती ही ती फुलराणी मालिकेत झळकली होती. त्यासोबत तिने महेश मांजरेकर यांच्या पांघरूण चित्रपटातही काम केले होते.
-
खुलता कळी खुलेना या मालिकेतून प्रसिद्ध झालेला अभिनेता ओमप्रकाश शिंदे हा सुद्धा बिग बॉसच्या नव्या सिझनचा भाग होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
-
अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील ‘अण्णा नाईक’ फेम अभिनेते माधव अभ्यंकर हे देखील बिग बॉसमध्ये सहभागी होणार असल्याचे बोललं जात आहे.
Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस’च्या घरात दिसणार ‘हे’ कलाकार ? संभाव्य नावाची यादी समोर
या सर्व यादीत अनेक मोठमोठ्या कलाकारांचा सहभाग आहे.
Web Title: Bigg boss marathi season 4 these marathi celebrities will participate in show know the detail list nrp