-
मराठी सिनेसृष्टीला अनेक मोठमोठी कलाकार मंडळी लाभली आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे दिवंगत अभिनेते मधुकर तोरडमल. मराठी नाट्यसृष्टीत त्यांना मामा तोरडमल म्हणून ओळखले जाते.
-
मधुकर तोरडमल यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची धाकटी लेक तृप्ती तोरडमल हिने काही वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
-
या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं मोठं कौतुक करण्यात आलं.
-
मराठी सिनेसृष्टीला एक ग्लॅमरस चेहरा मिळाल्याने प्रेक्षकांनीही तिचे कौतुक केले.
-
‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटातील भूमिकेद्वारे ती घराघरात पोहोचली.
-
तृप्तीने एका बॉलिवूड चित्रपटासाठी तिच्या नावात बदल केल्याचे बोललं जात आहे.
-
तृप्तीने नुकतंच तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर तिच्या नावात बदल केला असून तिने तिचे नाव आयेशा मधुकर असे ठेवले आहे.
-
एका मुलाखतीत नावात बदल केल्याबद्दलचा प्रश्नावर ती म्हणाली, “माझ्या जन्मपत्रिकेत माझं नाव आयेशा असंच आहे. जेव्हा मी सविता दामोदर परांजपे हा चित्रपट केला. त्यावेळी मला माझ्या नावात बदल करता आला नाही.”
-
पण आता लवकरच माझा बॉलिवूड चित्रपट येत आहे आणि त्यात मी माझं नाव आयेशा असं लावण्याचा निर्णय घेतला.
-
ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट १२ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
-
यात तृप्तीच्या वाट्याला महत्त्वाची भूमिका आली आहे. त्यामुळेच तिने नावात बदल केल्याचे बोललं जात आहे.
“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल